Next
‘जीजीआयएम’च्या निसर्गातील साहस शाळेला सुरुवात
प्रेस रिलीज
Wednesday, July 10, 2019 | 03:02 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘गिरीप्रेमी’ व ‘जीजीआयएम’तर्फे २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या ‘आव्हान-निर्माण-उडान’ या शालेय विद्यार्थ्यांच्या साहसी प्रशिक्षण अभ्यासक्रमाला सात जुलै २०१९ पासून सुरुवात झाली. हा अभ्यासक्रम १२ महिन्यांत विभागलेला असून, साधारण दर महिन्याला एक, दिवाळीच्या सुट्टीत तीन-चार दिवस आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आठ-दहा दिवस अशा कालावधीचा असून, इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून शिस्तबद्धपणे राबविला जाईल. उपक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षार्थींना ‘जीजीआयएम’तर्फे प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. 


‘निसर्गातील साहस शाळा’ अशी ओळख असणाऱ्या या अभ्यासक्रमात सहभागी झालेले १० ते १६ वर्षे वयोगटातील ३००हून अधिक विद्यार्थी सात जुलैला पुण्याजवळील सह्याद्रीतील विविध डोंगररांगांमध्ये ट्रेकिंगसाठी रवाना झाले. यात ‘आव्हान’चा ट्रेक नांदगिरी येथे, ‘आव्हान अॅडव्हांस’चा ट्रेक रायरेश्वर येथे, ‘निर्माण’चा ट्रेक राजमाची येथे, ‘निर्माण अॅडव्हांस’चा ट्रेक गार्बेट पठार, तर ‘निसर्गनाद’ या खुल्या गटाचा ट्रेक वैराटगड येथे आयोजित करण्यात आला होता.


‘गिरीप्रेमी’च्या संस्थापिका अध्यक्षा उषःप्रभा पागे यांच्या हस्ते या सर्व ट्रेक्सचा फ्लॅग ऑफ सात जुलैला पहाटे फर्ग्युसन कॉलेज येथे करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ गिर्यारोहक व जीजीआयएमचे संस्थापक संचालक उमेश झिरपे, गिरीप्रेमीचे एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर भूषण हर्षे, प्रसाद जोशी, आशिष माने व कृष्णा ढोकले, तसेच कांचनजुंगा शिखरवीर विवेक शिवदे, डॉ. सुमित मांदळे, जितेंद्र गवारे उपस्थित होते.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search