Next
फळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील ज्ञानू बाबू येडगे झाला पीएसआय
संदेश सप्रे
Wednesday, March 20, 2019 | 05:12 PM
15 0 1
Share this article:

एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर ज्ञानूने कुटुंबीयांसमवेत आनंदोत्सव साजरा केला.

संगमेश्वर :
‘तो’ सज्ञान होण्यापूर्वीच पितृछत्र हरपले. रस्त्यावर केळी विकण्याचा व्यवसाय त्याचे वडील करायचे आणि त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. वडिलांनंतर तेच काम करण्याची जबाबदारी ‘त्याच्या’वर आली. खचून न जाता त्याने आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन कुटुंब चालवले. असा जीवनसंघर्ष करता करताच अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. ‘त्या’चे नाव आहे ज्ञानू बाबू येडगे. तो रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीचा आहे. 

बाबू जानू येडगे यांना पुत्ररत्न नसल्याने त्यांनी आपले सख्खे बंधू धोंडिबा जानू येडगे यांच्याकडून ज्ञानूला दत्तक घेतले. त्यानंतर त्यांना कृष्णा नावाचा मुलगा झाला. कृष्णा आणि ज्ञानू यांचे त्यांनी बालपणापासून पालनपोषण केले. ज्ञानू १४ वर्षांचा असताना वडिलांचे (बाबू येडगे) यांचे निधन झाले. घर चालवण्यासाठी कुटुंबात सक्षम व्यक्ती नव्हती. मुंबईतील धोबीतलाव येथे त्याचे वडील केळी विकण्याचा व्यवसाय करायचे. वयाच्या १४व्या वर्षी ज्ञानूने हा व्यवसाय करायला सुरुवात केली. तो व्यवसाय करतानाच त्याने आपले माध्यमिक आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला एअर इंडिया कंपनीत सुरक्षा विभागात नोकरी मिळाली. सुरुवातीच्या काळात त्याने मुंबई विमानतळावर काम केले. नंतर त्याने पुणे विमानतळावरला बदली करून घेतली आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. २०१३मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळण्यापासून त्याला अवघ्या काही गुणांनी हुलकावणी दिली. २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या काळात ज्ञानूने राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पीएसआय पदासाठी चार वेळा मुख्य परीक्षा, तर विक्रीकर निरीक्षक पदासाठी दोन मुख्य परीक्षा दिल्या. पाच वर्षांच्या काळात त्याने खूप मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केला. कुटुंबातील भावंडांनीही त्याचे मनोबल वाढवण्यासाठी मदत केली. २०१७ला पीएसआय पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १४१० उमेदवारांपैकी ज्ञानूचा १६१वा क्रमांक आला. त्याची निवड झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा करून पेढे वाटले.

ज्ञानू धनगर समाजातील आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन थेट पीएसआय होणारा ज्ञानू हा रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजातील पहिलाच उमेदवार आहे. 

ज्ञानेशने अधिकारी व्हावे, असा त्याच्या भावांचा आग्रह होता. निवड झाल्याचे कळताच त्याचा आनंद द्विगुणित झाला. ‘मला जे यश मिळाले ते पाहायला माझे वडील नाहीत आणि मला प्रोत्साहन देणारा माझा चुलत भाऊ नामदेवही २०१८मध्ये जग सोडून गेला,’ अशी खंत त्याने बोलून दाखवली. 

संपर्क : संतोष येडगे – ९९२१० ४७५०३
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 194 Days ago
I hope , there will be more like him , in his community . Any way , does this not prove that , if you have merit , You can go ahead , that birth is not everything ?
0
0

Select Language
Share Link
 
Search