Next
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित
आठही मतदारसंघांसाठी सोशल मीडिया टीम सज्ज
BOI
Monday, September 09, 2019 | 03:21 PM
15 0 0
Share this article:

भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळपुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली.    

‘विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पुणे शहरातील वॉर-रूम प्रदेश आणि केंद्रीय वॉर-रूमला संलग्न असेल. पक्षाच्या शहरातील मुख्यालयातून या ‘वॉर रूम’चे काम चालणार आहे. शहरातील टीम, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी असेल. त्याच्या मदतीसाठी दहा जणांची टीम असेल. पुणे शहरात सुमारे १०० युवकांची टीम काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत मतदारांपर्यंत पोचविलेल्या योजनांची माहिती देतानाच तिहेरी तलाक रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे, चांद्रयान, सार्वजनिक स्वच्छता, मेट्रो आदींबाबत घेतलेल्या प्रमुख निर्णयांचीही माहितीही मतदारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे,’ असे मिसाळ यांनी सांगितले.

‘फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून भाजप मतदारांपर्यंत पोचणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय व्हॉटसअपचे ग्रूपही कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आठही आमदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत कोणती विकास कामे केली आहेत, याचीही माहिती मतदारांना मिळणार आहे. ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण, नव्या ई-बस, मेट्रोचे विस्तारीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठीच्या नियमावलीतील सुधारणा आदींचा त्यात समावेश आहे. सोशल मीडियावर मतदारांच्या मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या सूचना भाजपच्या वॉर-रूममध्ये नोंदविण्यात येणार आहेत,’ असेही मिसाळ यांनी सांगितले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search