Next
सिंगापूर टुरिझम बोर्डाची ‘ओला’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, December 05, 2018 | 01:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सिंगापूर टुरिझम बोर्डाने (एसटीबी) राइड हेलिंग कंपनी ओलाशी भागीदारी करत असल्याचे नुकतेच जाहीर केले. याचाच एक भाग म्हणून ‘ओला’द्वारे पश्चिम व मध्य भारतातील १९ शहरांत एक ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान एक अभियान राबवले जाणार असून, त्याअंतर्गत ग्राहकांना सिंगापूरची एक सहल जिंकता येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘ओला’ ग्राहकांना किमान तीन राइड्स घ्याव्या लागणार असून, ‘SINGAPORE’ हा पासकोड द्यावा लागेल. विजेत्यांच्या तीन जोड्या निवडून त्यांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ई-मेलने कळवले जाईल. या अभियानाशिवाय ‘एसटीबी’च्या ‘पॅशन मेड पॉसिबल’ ब्रँडचा कंटेंट ‘ओला’च्या सर्व व्यासपीठांवर दाखविला जाणार आहे.

जीबी श्रीथरयाविषयी बोलताना ‘एसटीबी’चे दक्षिण आशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिका (एसएएमईए) प्रादेशिक संचालक जीबी श्रीथर म्हणाले, ‘ओला हा भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. ही भागीदारी नाविन्यपूर्ण विपणन योजनांचा एक भाग असून, त्याद्वारे भारतीय ग्राहकांना आकर्षित करतानाच त्यांना सिंगापूरला जाण्याची संधी देण्यात आली आहे. यातून आमच्या वैविध्यपूर्ण योजनांची माहिती त्यांना द्यायची आहे. ‘ओला’बरोबर झालेल्या करारामुळे सिंगापूरला वेगळ्या प्रकारच्या ‘पॅशन ट्राइब’ला विविध अनुभव देण्याची संधी मिळेल.’

‘ओला’चे व्यावसायिक प्रमुख शेखर दत्ता म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना प्रवासाचा उत्तम अनुभव देण्यात आम्हाला अभिमान वाटतो. सिंगापूर टुरिझम बोर्डाबरोबर भागीदारी करून त्याद्वारे ग्राहकांना सिंगापूरची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि विविध अनुभवांचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे.’

२०१७ मध्ये सिंगापूला भारतातून १.२७ दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली. सिंगापूरसाठी सर्वाधिक पर्यटक आणणारा भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ दरम्यान १.१ दशलक्ष भारतीयांनी सिंगापूरला भेट दिली असून या संख्येत वार्षिक पातळीवर १४.६ टक्के वाढ झाली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link