Next
बोपैया कोंगेटिरांनी जिंकला ‘ऑफ-रोडर ऑफ दी इयर’ पुरस्कार
महिंद्रा अॅडव्हेंचर ‘ऑफ-रोडिंग ट्रॉफी’ची सांगता
प्रेस रिलीज
Thursday, July 18, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : महिंद्रा अॅडव्हेंचरने ‘ऑफ-रोडिंग ट्रॉफी २०१८-१९’ची यशस्वी सांगता केली असून, कोडगु येथील बोपैया कोंगेटिरा यांनी ‘ऑफ-रोडर ऑफ दी इयर’ पुरस्कार व नवी महिंद्रा थार ७०० लिमिटेड एडिशन जिंकली. १३ व १४ जुलै रोजी आयोजित केलेल्या ऑफ-रोडिंग ट्रॉफीच्या अंतिम स्पर्धेत मानाचा पुरस्कार पटकावण्यासाठी देशभरातील सर्वोत्तम ऑफ-रोडरनी एकमेकांना चुरस दिली. देशातील हा सर्वांत अवघड आणि सर्वाधिक गौरवणारा ऑफ-रोडिंग उपक्रम आहे.

‘ऑफ-रोडिंग ट्रॉफी २०१८-१९’मध्ये देशातील १० ग्रेट एस्केप्समधील ३१ विजेत्यांनी इगतपुरी येथील महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अॅकॅडमीच्या महिंद्राच्या ४x४ ट्रॅकवर एकमेकांशी स्पर्धा केली. भारतातील सर्वांत स्पर्धात्मक ऑफ-रोड आव्हानांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत अधिक अवघड आव्हान समाविष्ट केले होते. गुण देण्याच्या पद्धतीला अनुसरून, अडथळ्यांच्या दरम्यान संकलित करण्यात आलेल्या प्रत्येक झेंड्यासाठी एकंदर गुणांमध्ये १० गुण मिळवण्यात आले, तर प्रत्येक कोनवर आदळल्यानंतर एकूण गुणांमधून १० गुण वजा करण्यात आले.


सहभागी झालेल्यांसाठी स्पॉटिंग पॉइंट सुरू करण्यात आले व सेमिफायनल व फायनल फॉरमॅट रद्द करण्यात आला, याचे सहभागींनी स्वागत केले. कोणालाही स्पर्धेतून बाद करण्यात आले नाही आणि विशेष प्रकारे तयार केलेल्या सहापेक्षा अधिक ऑब्स्टॅकल कोर्सेसवर दोन्ही दिवशी प्रत्येकाने वाहन चालवले व स्पॉटिंग केले. त्यावर प्रत्येकाच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याची चाचणी घेण्यात आली, शिवाय समन्वय व खडकाळपासून बर्फाळपर्यंत विविध भूप्रदेशांत आणि विविध प्रकारच्या हवामानांत दबावाखाली गाडी चालवण्याची क्षमताही तपासण्यात आली.  

सहभागींनी दोन दिवसांमध्ये अनेक आव्हानात्मक ऑब्स्टॅकल्सचा सामना केला. सुरुवात गोफर डॅम येथून झाली. या ऑब्स्टॅकलमध्ये सहभागींना झेंडे गोळा करत व कोन टाळत, काही अवघड चढ व तीव्र उतार यामधून थार चालवायची होती. या ऑब्स्टॅकलसाठी, आगामी दुसऱ्या पिढीतील थारच्या नावानुसार नाव असणाऱ्या डब्ल्यू५०१ क्लाइम्बच्या सोबतीने गाडी चालवायची होती. हा ३५ फुटांहून अधिक चढ हे मनुष्य व मशीन या दोन्हींसाठी मोठे आव्हान होते. त्यामध्ये केवळ अनुभवी व अतिशय कुशल चालक निभावू शकतात.

दिवसाच्या दुसऱ्या सत्रात, सहभागींनी आणखी दोन आव्हाने पेलली, डीआय २.० आव्हान व एसयूव्ही आव्हान. डीआय २.०साठी सहभागींना बराच वेळ गाडी चालवावी लागली. त्यामध्ये त्यांना बर्फ असणारे चढ चढावे लागले, तसेच विशेष प्रकारे तयार केलेल्या खड्ड्यांतूनही गाडी चालवावी लागली. येथे ऑब्स्टॅकल पूर्ण करण्यासाठी थ्रॉटल कंट्रोलची भूमिका महत्त्वाची होती. २० गुण मिळवून देणारा सुपर फ्लॅग मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी चालकांना रट्सचा समावेश असणाऱ्या आव्हानात्मक चढाचा सामना करावा लागला. एकीकडे, सहभागींना एसयुव्ही आव्हान २.० मध्ये रट्सच्या मालिकेचे आव्हान पेलावे लागत होते. सुरळीतपणे गाडी चालवत असताना, मोठ्या रट्समधून वाट काढत असताना वाहनाचा समतोल साधण्याचे आव्हान होते. येथे, योग्य वेग हे यशाचे गमक होते. पहिला दिवस चार ऑब्स्टॅकलनी संपला.

दुसऱ्या दिवशी, काठीण्य पातळी आणखी वाढवण्यात आली. विशिष्ट ठिकाणी असलेल्या सुपर फ्लॅगसह सरपंच चॅलेंज सर्वांची वाट पाहत होते. तीव्र स्प्लश पिट व चढ-उतार यांचा सामना करणे, त्यानंतर खडकाळ भाग या स्वरूपामुळे सुपर फ्लॅग मिळवणे जवळजवळ अशक्य होते. इतकेच नाही, तर गुणतक्त्याच्या दृष्टीने हे निर्णायक ऑब्स्टॅकल होते. संघर्ष करणाऱ्या व ऑब्स्टॅकल पूर्ण करणाऱ्या सहभागींना स्पर्धेत पुढे जाता आले. हा टप्पा निर्णायक होता. त्यामध्ये ब्लाइंड झोन हा भाग धमाल, पण आव्हानात्मक ऑब्स्टॅकलचा होता. त्यामध्ये पाणी ओलांडून जाण्यापासून बर्फाळ चढ व तीव्र उतार यांचा समावेश होता.  


दोन दिवस ऑब्स्टॅकलचा सामना केल्यानंतर, कर्नाटकातील कोडगु येथील बोपैया के. यांनी विजेतेपद पटकावले व महिंद्रा थार हे पहिले बक्षीस मिळवले. त्यानंतर वायनाड येथील विपिन वर्गीस व केरळमधील एर्नाकुलम येथील अॅलन के. अब्राहम यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. महिलांच्या श्रेणीत, सलग दुसऱ्या वर्षी सपना गुरुकर यांनी विजेतेपद पटकावले.  

स्पर्धेचे परीक्षण महिंद्रातील मान्यवर परीक्षकांच्या मंडळाने केले. ग्रेडिंग सिस्टीम फ्लॅगचे गुण, पूर्ण केल्याबद्दल बोनस आणि वाहनाचे संरक्षण व सुरक्षितता यासाठी पाच गुण यावर आधारित होती. सर्व ऑब्स्टॅकलसाठी जास्तीत जास्त कालावधी व जास्तीत जास्त कितीदा प्रयत्न करता येईल ही संख्या निश्चित केलेली होती.    

या उपक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व वाहने महिंद्रा अॅडव्हेंचरने पुरवली आणि स्पेसिफिकेशन व टायर या बाबतीत ही सर्व वाहने सारखी होती. समानता राखण्यासाठी, प्रत्येक ऑब्स्टॅकलला सुरुवात करण्यापूर्वी सहभागींनी लॉट्स पाडले, जेणेकरून संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकजण एकाच पातळीवर राहतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search