Next
अशोक शिरफुले यांचा गुरुगौरव पुरस्काराने गौरव
नागेश शिंदे
Thursday, September 19, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:हिमायतनगर :
हिमायतनगरच्या जनता कॉलनीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिस्तप्रिय शिक्षक अशोक शिरफुले-पळसपूरकर यांचा नुकताच जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पाटील-जळगावकर आणि माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते शिक्षक दिनी कुसुम सभागृहात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर हे अशोक संभाजी शिरफुले यांचे मूळ गाव. ते प्राथमिक शाळेत अध्यापनाचे कार्य करतात. शिकवण्याची त्यांची हातोटी और असल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाखाणण्याजोगी आहे. गेल्या २१ वर्षांत त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. सामाजिक कार्यातही ते त्याच जोमाने कार्य करतात. 

त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने त्यांची गुरुगौरव पुरस्कारासाठी निवड केली. त्यांच्या गौरव कार्यक्रमाला नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक विजयकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यात गटशिक्षणाधिकारी रमेश संगपवाड, अरुण पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक सोनसळे, मुख्याध्यापक तथा ग्रामीण साहित्यिक डॉ. मारुती वाघमारे, डी. पी. शिंदे. राजकुमार केंद्रे, श्रीमती कासार, मुख्याध्यापक फोले, सहशिक्षिका पा. हलेनपट्टे रामदीनवार, केंद्रप्रमुख कल्याणकर आदींचा समावेश होता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search