Next
सिंधुदुर्गात रुजतेय ‘हॅम रेडिओ’ संस्कृती
BOI
Tuesday, October 17, 2017 | 09:45 PM
15 0 0
Share this article:

हॅम रेडिओचे उद्घाटन करताना मान्यवरवेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हॅम रेडिओ’ संस्कृती मूळ धरू लागली आहे. मोठी नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यात दळणवळणाची संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडली, तर अशा वेळी हॅम रेडिओची उपयुक्तता आपत्ती व्यवस्थापनात सिंहाचा वाटा उचलू शकते.

काही दिवसांपूर्वी तळेरे येथील डॉ. प्रकाश बावधनकर यांनी जिल्ह्यातील पहिले हॅम रेडिओ स्टेशन उभारल्यानंतर आता वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील एका शेतकऱ्याने खासगी हॅम रेडिओ स्टेशन उभारले आहे. त्याचा शुभारंभ अलीकडेच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाला. श्रीकांत रेडकर यांच्यासारख्या एका शेतकऱ्याने  स्वयंस्फूर्तीतून  उभारलेले हे रेडिओ स्टेशन ही जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी उपलब्धता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या वेळी केले.
 
वेतोरे येथे श्रीकांत रेडकर या शेतकऱ्याने जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वयंप्रेरणेतून हॅम रेडिओ स्टेशन उभारले आहे. या स्टेशनचे उद्घाटन अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. ‘तरुण भारत’चे पत्रकार शेखर सामंत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, हॅम रेडिओ तज्ज्ञ नितीन ऐनापुरे, हॅम तज्ज्ञ आणि निवृत्त नौसेना अधिकारी बसाप्पा अरबोळे, श्रीकांत रेडकर या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता श्रीकांत रेडकर यांच्यासारखी शेतकरी माणसे स्वयंस्फूर्तीतून पुढे येतात, याचा अभिमान वाटला. जिल्ह्यात अजूनही अशी काही माणसे, संस्था आहेत, ज्या स्वयंस्फूर्तीतून एक कर्तव्य म्हणून आपत्ती निवारण्यासाठी हातभार लावतात. अशांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे मला निश्चित आवडेल. नितीन ऐनापुरेंसारख्या तज्ज्ञाने या जिल्ह्याला हॅम तंत्रज्ञानाची जी ओळख करून दिली आणि ही यंत्रणा उभारण्यात जो मोलाचा वाटा उचलला त्याबद्दल त्यांचे, तसेच प्रशिक्षण देणारे आणि वेतोऱ्यातील स्टेशन उभारण्यास मदत करणारे बसाप्पा अरबोळे, प्रशिक्षण घेतलेले आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यात शासनाला मदत करणारे शेखर सामंत यांचेही जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो.’
 
हॅम रेडिओवरून संवाद साधताना विद्यार्थी.या उद्घाटनादरम्यान उपस्थित असलेल्या वेतोरे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी या हॅम स्टेशनची  माहिती  घेतल्यानंतर त्यांनी या हॅम रेडिओवरून एकमेकांशी संवाद साधला. यासाठी मुलामुलींचे गट करून त्यांना वॉकीटॉकी पुरवण्यात आल्या. शिक्षक आणि ग्रामस्थांनीही  हॅमवरून संवाद साधला. तत्पूर्वी शेखर सामंत, राजश्री सामंत, नितीन ऐनापुरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हॅम लायसन्सधारक समीर धोंड यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे हॅमची माहिती आणि जिल्ह्यातील वाटचाल सादर केली. हॅम तज्ज्ञ  एल. एस. रेड्डी यांचेही सहकार्य लाभले. श्रीकांत रेडकर यांनी आभार मानले. या वेळी वेतोरे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, वेतोरे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

‘सिंधुतरंग हॅम क्लब’चे उद्घाटन
या स्टेशनच्या उद्घाटनाचे औचित्य साधून नव्याने स्थापना करण्यात आलेल्या ‘सिंधुतरंग हॅम क्लब’चे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून  प्रशिक्षण घेतल्यानंतर लायसन्स घेतलेल्यांनी एकत्र येऊन हॅम क्लबची स्थापना केली आहे. या क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यात आणखी काही रेडिओ स्टेशन उभी करण्याचा आणि त्याचबरोबर समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे कार्य या क्लबकडून चालविले जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

‘व्हीएचएफ’द्वारे लवकरच मुंबईशी संवाद शक्य
हॅम यंत्रणेतील व्हीएचएफ यंत्रणेद्वारे (वॉकीटॉकी) लवकरच सिंधुदुर्गातून थेट मुंबईपर्यंत संवाद साधण्याचे आपले प्रयत्न सुरू असून त्यालाही लवकरच मूर्त रूप येईल, असे सूतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केले. सिंधुदुर्गात त्यासाठी रिपीटर बसवल्यानंतर व्हाया महाबळेश्वर थेट आपल्याला मुंबईशी बोलता येणार आहे. ही लिंक जोडण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. यासाठी ऐनापुरेंसारख्या तज्ज्ञांची मदत घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Tushar About
Khup stutya upakram
0
0

Select Language
Share Link
 
Search