Next
‘ब्ल्यू स्टार वॉटर प्युरिफायर्स’ची ३५ नवी मॉडेल्स
प्रेस रिलीज
Saturday, June 30, 2018 | 05:58 PM
15 0 0
Share this story

ओळी ‘ब्ल्यू स्टार’च्या वॉटर प्युरिफायर्सची नवी मॉडेल्स सादर करताना गिरीश हिंगोरानी व बी. थिआगराजन.

पुणे : ब्ल्यू स्टार लिमिटेड कंपनीने वॉटर प्युरिफायर्सची ३५ प्रकारची नवी मॉडेल्स सादर केली असून, आरओ, युव्ही, आरओ+युव्ही, आरओ+युव्ही+युएफ या तंत्रज्ञानांचा त्यात समावेश आहे. याखेरीज अँटीऑक्सिडेंट पाण्याचा पुरवठा करणाऱ्या इम्युनो ब्रूस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केलेली मॉडेल्सही त्यात समाविष्ट आहेत.

ब्ल्यू स्टार लिमिटेड कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक बी. थिआगराजन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख गिरीश हिंगोरानी यांनी नुकतीच येथे या नव्या मॉडेल्सची आणि कंपनीच्या विस्तार योजनेची माहिती दिली. थिआगराजन म्हणाले, ‘कंपनीला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. कंपनीने ऑक्टोबर २०१६ मध्ये निवासी पाणी शुद्धीकरण उद्योगात प्रवेश केला. हे औचित्य साधून कंपनीने वॉटर प्युरिफायर्सची  विविध प्रकारची नवी मॉडेल्स सादर केली आहेत. यामध्ये स्टेला, प्रिझ्मा, एज, इम्पिरिया, एलेनॉर, मॅजेस्टो, जिनिया, अरिस्तो आणि प्रिस्टीना यांचा समावेश आहे. त्यातील आरओ आणि तत्सम व्हेरिअंटमधील किमती दहा हजार ९०० रुपयांपासून ४४ हजार ९०० रुपयांपर्यंत आहेत. यूव्ही रेंजमधील वॉटर प्युरिफायर्सच्या किंमती सात हजार ९०० रुपयांपासून आठ हजार ९०० रुपयांपर्यंत आहेत. बहुसंख्य मॉडेल्सना आरओ आणि युव्ही असे दुहेरी संरक्षण आहे. या प्युरिफायरमधून गरम आणि थंड पाणी मिळू शकते. याशिवाय टच सेन्सर्स,  स्पीच मदतनीस, फिल्टर बदलण्याचा अॅलर्ट, अॅक्वा टेस्ट बूस्टर, चाईल्ड लॉक फंक्शन, अॅक्वा मिनरल इनफ्युजर इत्यादी वैशिष्ट्येही त्यात अंतर्भूत आहेत. स्टेला इम्पिरिया आणि एलेनॉर यासारखा मॉडेल, इम्युनो बूस्ट तंत्रज्ञानासह उपलब्ध आहेत. आगामी काळात व्यापारी (कमर्शिअल) वॉटर प्युरिफायर सिस्टीममध्येही  प्रवेश करण्याची कंपनीची योजना आहे.’

‘निवासी वॉटर प्युरिफायरची देशातील बाजारपेठ चार हजार २०० कोटींच्या घरात आहे. वर्षाला ती १५ ते २० टक्क्याने वाढत आहे. आर ओ, युव्ही आणि आर ओ+युव्ही तंत्रज्ञानाच्या प्युरिफायर्सची दरवर्षी साधारणतः २६ लाख युनिट एवढी विक्री होते. यातील ८५ टक्के युनिट्स विजेवर चालणारे असतात.  ब्ल्यू स्टार वॉटर प्युरिफायर १२५ शहरांत उपलब्ध असून, २०१९ मध्ये आऊटलेटसची संख्या तीन हजार ५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे गिरीश हिंगोरानी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link