Next
पुणे महानगर परिषदेतर्फे २७ सप्टेंबरला चर्चासत्र
प्रेस रिलीज
Wednesday, September 26 | 01:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील पुणे महानगर परिषद या संस्थेतर्फे ‘ऑनलाइन औषध विक्री योग्य की अयोग्य’ या विषयावर २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र नवी पेठेतील पत्रकार भवनात होईल.

या चर्चासत्रात अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, जनरल प्रॅक्टीशनर डॉ. चंद्रकांत परुळेकर, सायबर क्राइम प्रमुख राधिका फडके, औषध विक्रेता राष्ट्रीय संघटना सदस्य वैजनाथ जागुष्टे, औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील, ग्राहक पंचायत अध्यक्ष सुर्यकांत पाठक, ऑनलाइन औषध विक्रेते संचालक (ईझी फार्मा) अनिकेत बोरा, आउटसोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेड संचालक, एसवायएस  लॉजिकचे समीर गोडबोले यांचा सहभाग असणार आहे.

चर्चासत्राच्या संयोजन समितीमध्ये अध्यक्ष अ‍ॅड. गणेश सातपुते, कार्याध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष किरण बराटे, योगेश खैरे, सरचिटणीस केदार कोडोलीकर, खजिनदार संजय दिवेकर, सहखजिनदार अनिरुद्ध खांडेकर, चिटणीस दत्तात्रय जगताप, चिटणीस अ‍ॅड. राजेश तोंडे यांचा समावेश आहे.

चर्चासत्राविषयी :
दिवस :
गुरुवार, २७ सप्टेंबर २०१८
वेळ : दुपारी दोन वाजता
स्थळ : पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link