Next
मराठा चेंबरतर्फे ‘यूथ फेलोशिप’ची घोषणा
BOI
Tuesday, September 17, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’ अर्थात, ‘एमसीसीआयए’ने ‘यूथ फेलोशिप’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याद्वारे पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारक युवकांना एक वर्ष मराठा चेंबरसोबत फेलो किंवा स्कॉलर म्हणून काम करता येणार आहे.

‘‘एमसीसीआयए’ ही पुण्यातील उद्योजक, व्यापाऱ्यांची आघाडीची संस्था असून, त्याचे तीन हजारहून अधिक सभासद आहेत. या ‘फेलोशिप’ उपक्रमातून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभर ‘एमसीसीआयए’ व संलग्न संस्थांसोबत काम करता येईल. उमेदवारांना उद्योगजगताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, अन्नप्रक्रिया, प्रशासन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आदी १६ विभागांत काम करण्याची संधी मिळेल. पुण्यासह देशभरातील आघाडीच्या उद्योगांचे संस्थापक व कार्यकारी प्रमुखांची भेट, धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याचीही संधी त्यांना मिळेल,’ अशी माहिती चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.

या फेलोशिपसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ‘एमसीसीआयए’च्या वेबसाइटला भेट द्यावी; तसेच आपले अर्ज २५ सप्टेंबरपूर्वी satavishan@mcciapune.com ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन संस्थेने केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search