Next
रेल्वे आरक्षणाबरोबरच साईदर्शनाचे पासेस
शिर्डीतील श्री साईबाबा संस्‍थानची सुविधा
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this story

शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्या वतीने रेल्‍वेने प्रवास करून शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्‍तांना ई-रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षित करण्‍याची सुविधा २६ जानेवारी २०१९ पासून सुरू केल्याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

केंद्रीय रेल्‍वे मंत्री पियुष गोयल हे शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आले असता संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. हावरे यांनी साईभक्‍तांना ई-रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षित करण्‍याची सुविधा सुरू करण्‍याची मागणी केली होती. गोयल यांनी ही मागणी तात्‍काळ मान्‍य करून या संदर्भात ‘आयआरसीटीसी’ला आदेश दिले होते. त्‍यानुसार आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या साईभक्तांना ई-रेल्वे तिकीट आरक्षण करतेवेळेसच श्री साईंच्या दर्शनाचे पासेस आरक्षित करण्याची सुविधा ई-रेल्‍वे तिकीट बुकिंग ‘आयआरसीटीसी’च्या वेबसाइटवरून संस्थानच्या ऑनलाइन सर्व्हिसेस या वेबसाइटद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे साईभक्तांच्या वेळेची बचत होऊन साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन तात्‍काळ होणार आहे. ही सुविधा २६ जानेवारीपासून सुरू झाली असून, साईनगर-शिर्डी, कोपरगाव, नगरसूल, मनमाड व नाशिक या स्टेशनचे ई-रेल्वे तिकीट आरक्षित करणाऱ्या साईभक्तांसाठी उपलब्‍ध असणार आहे.

श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डी साईनगर रेल्‍वे स्‍टेशनवर आठवडाभरात सुमारे ६० गाड्या ये-जा करत असून, हावडा, पुरी, चेन्‍नई, म्हैसूर, विशाखापट्टणम्, सिकंदराबाद, तिरुपती, काकीनाडा, दिल्‍ली, मुंबई आदी ठिकाणांहून गाड्या येतात. यासर्व रेल्‍वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या लाखो साईभक्‍तांना या सुविधेचा फायदा होणार असल्‍याचे डॉ. हावरे यांनी सांगितले.

श्री साईबाबा संस्थानची वेबसाइट : online.sai.org.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link