Next
‘पाच एचपीपेक्षा जास्त कृषीपंपांना पारंपरिक पद्धतीने वीज’
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानपरिषद प्रश्नोत्तरात माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 06:14 PM
15 0 0
Share this article:

सौर कृषी पंपमुंबई : ‘तीन आणि पाच हॉर्सपावर (एचपी) विद्युत क्षमता असलेल्या कृषीपंपांना सौर ऊर्जा पद्धतीने वीज वितरित केली जाते. पाच एचपीपेक्षा क्षमतेच्या पंपाला पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २५ हजार नग सौर कृषीपंप महावितरणतर्फे आस्थापित करण्याची कार्यवाही केली जात आहे,’ अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

आज (१९ जून २०१९) विधानसभेत सदस्य नसीम खान यांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे बोलत होते. या चर्चेत भारत भालके, भास्कर जाधव, एकनाथ खडसे, जयंत पाटील हे सहभागी झाले होते. 

ते म्हणाले, ‘राज्यात शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व इतर उद्द‍िष्ट साध्य करण्याच्या दृष्ट‍िने पारेषणविरहीत एक लक्ष सौर कृषीपंप, टप्प्या टप्प्याने आस्थापित करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एक लाख ५५ हजार ४९७ कृषी पंपासाठी अर्ज प्राप्त होते. त्यापैकी पात्र ठरलेल्या ६४ हजार पैकी २५ हजार सौर कृषीपंप सुरू केले आहेत. पाच एचपीच्यावर क्षमता असलेल्या पंपांना पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा निर्णय झाला आहे. याचबरोबर अर्ज केलेल्या अपात्र शेतकऱ्यांनी निकषांची पूर्तता केल्यास त्याच्या अनुज्ञेयतेनुसार सकारात्मक विचार करण्यात येईल.’

‘मागेल त्याला शेततळे या योजनेची अंमलबजावणी करताना सौर ऊर्जापंपाची जोडणी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ज्यांना सौर कृषी पंप घ्यायचे आहेत त्यांनी ते घ्यावेत अथवा ज्यांना पारंपरिक वीज जोडणीने कृषी पंप घ्यावयाचे आहेत. त्यांनी पारंपारिक पद्धतीने घ्यावा,’ असे त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search