Next
सेन्सेक्सची विक्रमी उच्चांकाला गवसणी
३९ हजारांचा टप्पा पार; निफ्टीही सर्वोच्च पातळीजवळ
BOI
Wednesday, April 03, 2019 | 01:32 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) दोन एप्रिल २०१९ रोजी इतिहासात प्रथमच ३९ हजारांचा सार्वकालिक उच्चांकी टप्पा पार करून तो टिकवून ठेवण्यात यश मिळवले. याआधी २९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने ३८ हजार ९८९पर्यंत झेप घेतली होती. त्यानंतर दोन एप्रिल २०१९ रोजी सेन्सेक्सने ३९ हजारांचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठण्यात यश मिळवले. 


मंगळवारी दिवसअखेर सेन्सेक्स ३९ हजार ५६ अंकांवर स्थिरावला. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी, एक एप्रिल २०१९ रोजी सेन्सेक्सने ३९ हजारच्या पुढे झेप घेतली होती; पण दिवसअखेर ती पातळी टिकवून ठेवण्यात सेन्सेक्सला अपयश आले. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा सार्वकालिक उच्चांक गाठण्याचा योग हुकला. अखेर मंगळवारी सेन्सेक्सने ३९ हजारांची पातळी पार करून ती टिकवून ठेवली. यापुढे सेन्सेक्स किती उच्चांक नोंदवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


निफ्टीही सार्वकालिक उच्चांकाजवळ 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही या विक्रमी घोडदौडीत सहभागी असून, तो सार्वकालिक उच्चांकापासून केवळ ४७ अंक दूर आहे. २९ ऑगस्ट २०१८ रोजी निफ्टीने ११ हजार ७६० असा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक नोंदवला होता. तो अद्याप मोडला गेलेला नाही. मंगळवारी, दोन एप्रिल रोजी निफ्टीने ११ हजार ७००चा टप्पा ओलांडला; मात्र दिवसअखेर तो ११ हजार ७१३ वर स्थिरावला. बुधवारच्या सत्रात निफ्टी सार्वकालिक उच्चांक नोंदवण्याची शक्यता आहे. 

परदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद आणि देशांतर्गत चलनाला आलेल्या मजबुतीमुळे सेन्सेक्सने ही उसळी घेतली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. गुरुवारी, पाच एप्रिल २०१९ रोजी रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार आहे. त्यात रेपोदरात पाव टक्क्याची कपात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आशेचे वातावरण असल्याने खरेदीकडे कल वाढला आहे. 

(शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणारे डॉ. वसंत पटवर्धन यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search