Next
आयसीआयसीआय बँक व इंडोस्टार कॅपिटल यांची भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 01:53 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने लहान व मध्यम फ्लीट मालकांना जुन्या व नव्या कमर्शिअल व्हेइकल्सची (सीव्ही) खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठा करण्याच्या हेतूने इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड (इंडोस्टार) या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीशी भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. कमर्शिअल व्हेइकल्सना वित्तपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेला व्यावसायिक बँक व एनबीएफसी यांच्यातील अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच सहयोग आहे.

या भागीदारीनुसार, इंडोस्टार संपादन, डॉक्युमेंटेशन, संकलन व कर्ज सेवा याद्वारे ग्राहक मिळवणार आहे व त्यांना सेवा देणार आहे. आयसीआयसीआय बँक या ग्राहकांना सेवा देणार असून, त्यांना आतापर्यंत संघटित कर्जे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. व्यावसायिक वाहनांचा वापर करून व्यावसायिक वाहनांना अर्थपुरवठा करण्यामध्ये हातखंडा मिळवलेल्या इंडोस्टारने टिअर टू, थ्री, फोर शहरांमध्ये, जेथे इंडोस्टारच्या शाखा आहेत तेथे ग्राहक मिळवायचे ठरवले आहे. या शहरांमध्ये कोइम्बतूर, सालेम, तिरुनवेली, कुर्नूल, कालिकत, त्रिवेंद्रम, जबलपूर, भोपाळ, अहमदाबाद, राजकोट, जोधपूर, अल्वर व मीरत अशा केंद्रांचा समावेश आहे. एनबीएफसीच्या ३२२ शाखा आहेत.

या भागीदारीविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे सिक्युअर्ड अॅसेट्सचे प्रमुख रवी नारायणन म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेने स्थापनेपासूनच भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही परंपरा कायम राखत, लहान व मध्यम फ्लीट मालकांना सुरळीतपणे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि देशाच्या पायाभूत सुविधांच्या वाढीमध्ये योगदान देण्यासाठी इंडोस्टारशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. ही भागीदारी, बँकेच्या कार्यक्षम कर्जव्यवस्थेचा आणि जास्तीत जास्त लोकांना कर्ज उपलब्ध व्हावे, या हेतूने इंडोस्टारच्या देशातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याच्या क्षमतेचा लाभ घेणार आहे. या सहयोगामुळे, उद्योजकांना नव्या व जुन्या कमर्शिअल व्हेइकल्सची खरेदी करणे शक्य होणय्साठी आम्ही देशभर कार्यरत असणार आहोत.’

इंडोस्टारचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अध्यक्ष आर. श्रीधर म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेसारख्या संस्थेबरोबर काम करण्याची संधी मिळणे आणि आयसीआयसीआय बँकेशी अशा प्रकारे सहयोग करणारी पहिली एनबीएफसी ठरणे, ही इंडोस्टारसाठी आनंदाची बाब आहे. या सहयोगामुळे, बँकेची बॅलन्सशीटची क्षमता आणि आमची देशातील लहान शहरांत अपुरी सेवा मिळणाऱ्या सीव्ही फायनान्सिंग ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आमची क्षमता यांची सांगड घातली जाणार आहे. आपापल्या क्षेत्रातील अनुभव, तत्परता आणि क्षमता व आकार यासह असणारी व्याप्ती यांची ही भागीदारी आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search