Next
‘जिवलगा’ ‘हॉटस्टार’वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : अल्पावधीतच लोकप्रिय ठरत असलेल्या ‘जिवलगा’ या ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ही मालिका ‘हॉटस्टार’वर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. ‘टिकटॉक’ आणि ‘हॅलो’सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरही ‘जिवलगा’ हॅशटॅग ट्रेंड होत असून, तरुणाईमध्ये या मालिकेविषयी प्रचंड कुतूहल असल्याचे समोर आले आहे.

‘जिवलगा’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत रात्री ८.३० वाजता दाखविली जाते. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी दमदार स्टारकास्ट, उत्कंठावर्धक कथानक आणि ग्लॅमरस लूकमुळे या मालिकेला प्रेक्षकांतून पसंती मिळत आहे. ‘जिवलगा’ मालिकेचे कथानक सध्या खूपच रोमांचक वळणावर आले असून, निखील आणि काव्याच्या प्रेमप्रकरणाविषयी विधीला कळले आहे. निखील विधीपासून ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असला, तरी विधीपासून कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नाही. या भावनिक वळणावर विधीचा निर्णय काय असेल याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search