Next
विद्यार्थ्यांची ‘लाइव्ह ऑनलाइन क्लासेस’ना पसंती
‘ग्रेडअप’तर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाचा निष्कर्ष
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ऑनलाइन शिक्षणासाठी आणि परीक्षांच्या तयारीसाठी भारतीय विद्यार्थ्यांची ‘लाइव्ह ऑनलाइन क्लासेस’ना पसंती मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ग्रेडअप’ या भारतातील स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या सर्वात मोठ्या व्यासपीठाने ‘विद्यार्थ्यांची तयारीची पद्धत’ आणि ‘लाईव्ह ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि संधी’ जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

सध्या जे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी ऑफलाइन मोड वापरत आहेत, त्यांच्यापैकी ७० टाके विद्यार्थ्यांना लाइव्ह ऑनलाइन क्लासेसमध्ये प्रवेश मिळाल्यास ते ऑनलाइन शिक्षणाकडे वळतील. यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ‘तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन’ हे असे करण्यामागील कारण असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त ९० टक्क्यांपेक्षा अधिक सहभागी विद्यार्थ्यांनी आपण ऑफलाइन प्रशिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धती पसंत करू, असे सांगितले. घरबसल्या तयारीची सुविधा, लाइव्ह क्लासेसमध्ये प्रवेश आणि ‘खर्चातील लाभ’ हे तीन घटक या निवडीसाठी मुख्यतः जबाबदार आहेत. 

लाइव्ह क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी ते अतिरिक्त पैसे भरण्यासाठी तयार असतील, असे एकूण सहभागी विद्यार्थ्यांपैकी २० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. ऑनलाइन शिक्षणास प्राधान्य देणाऱ्यांपैकी ६३ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी लाइव्ह क्लासेसला पसंती दर्शवली आहे, तर २९ टक्के इतक्या कमी विद्यार्थ्यांनी रेकॉर्डेड व्याख्यानांची निवड केली आहे. लाइव्ह क्लासेस निवडण्याची विद्यार्थ्यांनी सांगितलेली प्रमुख कारणे म्हणजे, ‘तत्काळ शंका निरसनासाठी परस्पर संवाद’ आणि ‘दर दिवसाच्या अभ्यासाचे योग्य नियोजन’. विद्यार्थ्यांना लाइव्ह ऑनलाइन क्लासेसचे अधिकाधिक फायदे जाणवत आहेत आणि आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी तेयात प्रवेश घेण्याचा विचार करत असल्याचे हे निष्कर्ष स्पष्ट संकेत देत आहेत.

‘ग्रेडअप’चे सहसंस्थापक शोभित भटनागर म्हणाले, ‘लाइव्ह ऑनलाइन क्लासेसद्वारे अधिक परस्परसंवादी शिक्षणासह, एकूण शिक्षणाचा अनुभव सुधारला आहे, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे सुलभ झाले आहे. शिक्षणाच्या निकालांतही भरपूर सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘ग्रेडअप क्लासरूम - लाइव्ह क्लासेस’सुरू करून, तज्ज्ञ शिक्षक, व्यवस्थित आखलेली अभ्यास योजना आणि तत्काळ विद्यार्थी-शिक्षक संवाद याद्वारे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारी संबंधित त्रुटी कमी करण्यास सक्षम झालो आहोत.’

जेईई, एनईईटी, बँकिंग, गेट, एसएससी आदींसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे ई-मेल, ऑनलाइन सर्वेक्षण, दूरध्वनी आणि वैयक्तिक संवादाद्वारे तीन महिन्यांच्या कालावधीत अहवालाचे सर्वेक्षण करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search