Next
हिमायतनगर ‘भाजप’ तालुकाध्यक्षपदी आशिष सकवान
नागेश शिंदे
Monday, March 11, 2019 | 12:40 PM
15 0 0
Share this article:हिमायतनगर : येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तत्कालीन तालुकाध्यक्ष विजय नरवाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर यांनी नऊ मार्च २०१९ रोजी आयोजित एका कार्यक्रमात आशिष सकवान यांची या पदावर नियुक्ती करत असल्याचे जाहीर करून तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.

आशिष सकवान‘गाव तिथे शाखा’ काढून हिमायतनगरमध्ये ‘भाजप’ची ताकद वाढविण्याचे काम विजय नरवाडे यांनी केले; मात्र दोन महिन्यांपूर्वी अचानक त्यांचे निधन झाल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘भाजप’चे सक्रीय कार्यकर्ते आशिष सकवान यांच्या कार्याची दखल घेऊन नऊ मार्च रोजी नांदेड येथील एका कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील यांनी हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी आशिष सकवान यांच्यावर टाकली आणि त्यांचे नियुक्ती पत्रही देण्यात आले. सकवान यांच्या निवडीमुळे शहरात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, उपसभापती सुधाकर पाटील, प्रसाद डोंगरगावकर, राजेश जाधव, खंडू चव्हाण, बाबुराव बोड्डावार, विठ्ठल पार्डीकर, ‘भाजयुमो’चे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, पवन करेवाड, प्रशांत देवकते, राहुल नरवाडे, सुरज दासेवार, विकास नरवाडे, बालाजी ढोणे, आकाश नलावडे आदींनी सकवान यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search