Next
‘केपीआयटी स्पार्कल’च्या पाचव्या पर्वासाठी नोंदणी सुरू
प्रेस रिलीज
Monday, May 07 | 01:02 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘केपीआयटी’ या उत्पादन अभियांत्रिकी (प्रोडक्ट इंजिनीअरिंग) आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार (आयटी कन्सल्टिंग) क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जागतिक दर्जाच्या टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे ‘केपीआयटी स्पार्कल २०१९’ या राष्ट्रीय पातळीवर डिझाइन आणि डेव्हलपमेंट स्पर्धेच्या पाचव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी भारत सरकारचा डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी (डीएसटी) आणि नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनसोबत (एआयएम) हातमिळवणी करण्यात आली आहे.

नाविन्यतेची संस्कृती तयार करणे आणि सामाजिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना समोर आणणे यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘केपीआयटी स्पार्कल’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत लक्ष केंद्रीत करण्यात येते.

भविष्यातील दळवळण आणि ऊर्जा ही यंदाच्या पर्वाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ऊर्जा व ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी स्मार्ट, बुद्धिमान आणि पर्यावरणस्नेही उपाययोजना तयार करणे हे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान आहे. दिलेल्या कोणत्याही एका विषयावर विद्यार्थी आपल्या कल्पना सादर करू शकतात. या विषयांव्यतिरिक्त काही कल्पना असतील तर त्याही सादर करण्याची मुभा आहे.

स्पर्धेसाठी ‘सौर व पवन ऊर्जेसारख्या पर्यायी स्रोतांचा वापर करून उर्जानिर्मिती, बायो-हायड्रोजन, फ्युएल सेल्स आणि इतर ज्वलनशील मटेरिअलचा वापर करून उर्जा साठवणूक, उर्जेचा वापर करण्यासाठीची तंत्रज्ञान निर्मिती इत्यादी’ आणि ‘हरित, सुरक्षित, शेअर्ड, कनेक्टेड आणि ग्राहकाला सुलभपणे वापरता येण्याजोग्या दळणवळण/वाहतूक उपाययोजना इत्यादी.’ हे विषय आहेत.

पात्रतापूर्व फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांना फेब्रुवारी २०१९मध्ये पुण्यात होणाऱ्या प्रदर्शनात त्यांच्या उपाययोजनांचे वर्किंग प्रोटोटाईप विकसित करून ते सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. या व्यवसायातील प्रख्यात तज्ज्ञ, तंत्रज्ञ, विद्वान आणि अग्रणी उद्योजकांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षकांकडून या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात येईल.

विजेत्यांना एकूण रोख २१ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. या पर्वापासून ‘स्पार्कल’ स्पर्धेला विद्यार्थ्यांमधील उद्योजकक्षमतांना चालना देण्यासाठी व्यासपीठ म्हणून विस्तारित करण्याचे ‘केपीआयटी’चे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेने डीएसटी आणि नीती आयोगाच्या एआयएम या उपक्रमाशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्यातर्फे विजेत्या स्पर्धकांना संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी इनक्युबेशन सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ‘केपीआयटी’ने डिझाइन आणि व्यवस्थापन संस्थांशी सहयोग केला आहे.

‘केपीआयटी’चे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पंडित म्हणाले, ‘वर्षागणिक ‘स्पार्कल’तर्फे नवे मापदंड तयार करण्यात येत आहेत. गेल्या चार वर्षांपासून आम्ही अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्याच्या तंत्रज्ञानविषयक ज्ञान आणि वैज्ञानिक विचारसरणीला ‘स्पार्कल’च्या माध्यमातून चालना देत आहोत. यंदाच्या पर्वात आम्ही अजून एक मोठी उडी घेतली आहे. डीएसटी आणि एआयएम-नीती आयोगाच्या सहयोगाना उदयोन्मुख इनोव्हेटर्सना इनक्युबेशन सेंटर उपलब्ध करून देऊन त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंटेलिजंट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग पर्यावरणस्नेही आणि हरित करण्यासाठी नव्या प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही मार्ग आखून देणार आहोत.’

नोंदणी आणि कल्पना दाखल करणे किंवा मूल्यमापन टप्पा- एप्रिल ते सप्टेंबर २०१८, प्रारूप आणि व्हिडियो दाखल करणे- मे ते नोव्हेंबर २०१८, अंतिम फेरीसाठी निवड- नोव्हेंबर ते डिसेंबर २०१८ आणि पुण्यात महाअंतिम फेरी- फेब्रुवारी २०१९ या चार टप्प्यांमध्ये ‘केपीआयटी स्पार्कल २०१९’ ही स्पर्धा घेण्यात येईल:

२०१८ साली या स्पर्धेच्या नामांकनांमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ दिसून आली. महाविद्यालयांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली, तर प्रारूपांची संख्या २० टक्क्यांनी वाढली. भविष्यातील ऊर्जा आणि दळवळण उपाययोजना या संकल्पनेवर भारतातील ६००हून अधिक अभियांत्रिकी आणि विज्ञान महाविद्यालयांतील १२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते.

अर्ज करण्याविषयी विस्तृत माहितीसाठी : https://sparkle.kpit.com/ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link