Next
२३ दिवसांत एकट्याने सायकलवरून अमरनाथ यात्रा!
नाशिकच्या महेश जमदाडे यांनी केला ४०८० किलोमीटर सायकलप्रवास
BOI
Wednesday, July 31, 2019 | 02:34 PM
15 0 0
Share this article:

महेश जमदाडे यांचे स्वागत करताना नाशिककर

नाशिक :
नाशिक ते अमरनाथ आणि अमरनाथ ते पुन्हा नाशिक असा ४०८० किलोमीटरचा प्रवास नाशिकचे महेश जमदाडे यांनी २३ दिवसांत एकट्याने सायकलवरून पूर्ण केला. सायकलवरून अमरनाथ यात्रा पूर्ण केल्यानंतर नाशिककरांनी नुकतेच त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

महेश जमदाडे यांनी २१ जून रोजी नाशिक येथून सायकलने आपला प्रवास सुरू केला होता. रोज साधारण १७५ ते २०० किलोमीटर प्रवास त्यांनी केला. ३० जूनला ते पहलगाम येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी अमरनाथ येथील गुंफा, तसेच बाबा बर्फानी यांचे दर्शन घेतले. तसेच, वैष्णोदेवी, अमृतसर, वाघा बॉर्डर येथील लहानमोठ्या २३ धार्मिक आणि पर्यटनस्थळांनाही सायकलवरून भेट दिली. वाटेत अनेक लोकांनी त्यांनी खाण्यापिण्यासह निवासाची व्यवस्था केली. अनेक लोकांनी आर्थिक मदतही केली. या २३ दिवसांच्या प्रवासात अनेक भाविक, चांगली माणसे आपल्या भेटल्याचे जमदाडे यांनी सांगितले.

यात्रा पूर्ण करून आल्यानंतर नाशिकला नुकतेच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नाशिक शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या आडगावापासून क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले. नांदूर जत्रा रोडवरील गार्डन काउंटी सोसायटीच्या रहिवाशांनी त्यांची मिरवणूक काढली. नाशिकमधील क्रीडाप्रेमी या वेळी उपस्थित होते. 

प्रवीण खाबिया, सदस्य डॉ. आबा पाटील, सतीश बालटे, रामदास निंबाळकर, माणिक निकम, डॉ. सुहास घुगे, अजय आवारे, नागराज पाटील, भगवान खरोटे, मेघना जमदाडे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. या सायकल यात्रेसाठी त्यांना डॉ. आबा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

‘सायकलवरून अमरनाथ यात्रा करावी, हा विचार तीन वर्षांपासून माझ्या डोक्यात होता. त्यासाठी सहा महिने सराव केला. रस्त्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मनापासून मला मदत केली. पंजाबमधील ट्रक ड्रायव्हरने राहण्यासाठी आसरा दिला. धाबाचालकांनीही राहण्याची व्यवस्था केली. या सगळ्यामुळे मी यात्रा पूर्ण करू शकलो. डॉ. आबा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे यात्रा करण्याचा हुरूप आला,’ अशी भावना महेश जमदाडे यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Aahe v.c About 75 Days ago
Good
0
0

Select Language
Share Link
 
Search