Next
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार’
प्रेस रिलीज
Monday, November 13, 2017 | 12:38 PM
15 0 0
Share this article:

लोकसभेच्या सभापती खासदार सुमित्रा महाजन यांच्यासोबत रवींद्र गुर्जर.पुणे : ‘मराठी भाषा ही जगातील १०व्या क्रमांकाची भाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करेन,’ असे आश्वासन लोकसभेच्या सभापती खासदार सुमित्रा महाजन यांनी दिले.

९१ व्या बडोदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र गुर्जर आणि 'साहित्यसेतू'चे प्रा. क्षितीज पाटुकले यांनी ‘मराठी भाषेला त्वरीत अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,’ अशी मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी महाराष्ट्रातील विविध संस्था कार्य करीत आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त करून बृहन्महाराष्ट्र आणि विदेशातील मराठी संस्थांच्या कार्याची दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठीमध्ये नवीन युवा लेखक, अनुवादक तयार व्हावेत, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती युवा पिढीबरोबर जोडली जावी आणि देश-विदेशातील मराठी साहित्य संस्थांमध्ये समन्वय निर्माण व्हावा, म्हणून साहित्य सेतू जे कार्य करीत आहे, याबद्दल महाजन यांनी त्यांचे कौतुक केले.

या वेळी संमेलनच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी गुर्जर यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शैलेंद्र बोरकर, अनिल कुलकर्णी, तुषार पाटील, कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 175 Days ago
People will not learn anything which will not help them in life , no matter what a government does It is their perception that matters.
0
0

Select Language
Share Link
 
Search