पुणे : ‘पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, यातून आम्हालाही ऊर्जा मिळाली आहे. पुढील वर्षभरात विविध ठिकाणी हजारो वृक्षांचे रोपण केले जाणार असून, या झाडांचे संवर्धन विद्यार्थी करणार आहेत’, असे लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य फतेचंद रांका यांनी सांगितले.
लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागच्या वतीने सोलापूर रस्त्यावरील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा संचालित एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल, सचिव संतोष पटवा, कार्यक्रमाच्या समन्वयक आशा ओसवाल, शाळेच्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या समन्वयिका लक्ष्मी गिडवाणी, विद्यालयाच्या प्राचार्य शोभा कमलाकर, लायन्सचे ज्येष्ठ सभासद अशोक रुकारी, मुद्रिक पुनावाला यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद, तसेच विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध प्रकारची एकूण १५० झाडे शाळेच्या परिसरात लावली असून, त्याचे संवर्धन शाळेतील विद्यार्थी करणार आहेत. ही झाडे जागविण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. प्राचार्या शोभा कमलाकर यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत परिट यांनी सूत्रसंचालन केले, तर माधुरी जाधव यांनी आभार मानले.