Next
‘भीमाशंकरचा विकास करण्यासाठी तयार करण्यात येतोय विकास आराखडा’
महाशिवरात्रीच्या निमित्ताने महापूजेसाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
BOI
Monday, March 04, 2019 | 05:01 PM
15 0 0
Share this story


पुणे : महाशिवरात्रीच्या निमित्ताने जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असलेल्या सहाव्या ज्योतिर्लिंगाची शासकीय महापूजा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी ‘हर हर महादेव’च्या गजरात परिसर दणाणून गेला.

चौदा वर्षानतंर यंदा सोमवारी महाशिवरात्र आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बारा ज्योर्तिलिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकर येथे महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक मोठया संख्येने येत असतात. मध्यरात्री बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत ही महापूजा पार पडली. 

मंदिरातील गुरवाच्या हस्ते पहिली पूजा केल्यानतंर मुख्य महापुजेला सुरुवात होते. मंत्रांच्या घोषात महादेवाच्या पिंडीवर दूध, दही, मध, साखर यांचा अभिषेक केला जातो. त्यानतंर बेल वाहून आरती करण्यात येते. ‘भीमाशंकर परिसराचा विकास करण्यासाठी सध्या दोनशे कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यातील काही कामे सुरू झाली आहेत’, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या वेळी सांगितले.

(जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आलेल्या महापूजेचा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link