Next
विजय पुराणिक भाजपचे नवे प्रदेश संघटनमंत्री
प्रेस रिलीज
Wednesday, March 21 | 11:19 AM
15 0 0
Share this story

विजय पुराणिकमुंबई : भारतीय जनता पक्षाच्या  ‘महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस’पदी (संघटन) विजय मनोहर पुराणिक यांची नियुक्ती झाली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ही नियुक्ती केली असून, या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी पुराणिक यांचे अभिनंदन केले आहे.

अमित शाह यांनी विजय पुराणिक यांची महाराष्ट्रासोबत गोव्याच्याही भाजप प्रदेश सरचिटणीसपदी ( संघटन ) नियुक्ती केली आहे.

प्रदेश संघटनमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी पुराणिक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक म्हणून जबाबदारी होती. त्यांनी १९८७मध्ये संघाचे प्रचारक म्हणून कामाला सुरुवात केली. मुरबाड तहसील प्रचारक, धुळे आणि नगर जिल्हा प्रचारक, संभाजीनगर व लातूर विभाग प्रचारक, देवगिरी प्रांत सहप्रचारक व प्रांत प्रचारक तसेच, पश्चिम क्षेत्र सहप्रचारक व प्रचारक या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link