Next
‘टाटा पॉवर’ने कार्यान्वित केले स्मार्ट उपस्थानक
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 12:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा पॉवर या भारतातील सर्वांत मोठ्या एकात्मिक वीजकंपनीने मुंबईत आपले ‘आयओटी’ आधारित स्मार्ट ग्राहक उपस्थानक (सीएसएस) लाँच करण्यासाठी टाटा कम्युनिकेशन्सची निवड केली आहे.  

आपल्या ग्राहकांना वीजपुरवठ्याबाबत जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी टाटा पॉवरने ‘सीएसएस’च्या अतिप्रगत सोल्युशन्सवर काम केले आहे. यामुळे टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील ‘सीएसएस’चा आढावा घेणे तसेच विविध ठिकाणच्या वितरण उपस्थानकांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या सोल्युशनमुळे फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातात बाळगण्याजोग्या उपकरणातील व्हिज्युअल डॅशबोर्डवर वेळोवेळी सूचना येतील आणि त्यावरून लगेच कृती करणे त्यांना शक्य होईल.

या लाँचबद्दल टाटा पॉवरचे सीओओ आणि ईडी अशोक सेठी म्हणाले, ‘ग्राहक व सर्व संबंधितांच्या सोयीसाठी तसेच भल्यासाठी टाटा पॉवरने सर्वोत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानात्मक उपायांचा अंगिकार व अंमलबजावणी यशस्वीरित्या केली आहे. या सोल्युशनमुळे आमच्या वितरण कर्मचाऱ्यांना उपस्थानके तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर्सवर प्रभावीरितीने देखरेख ठेवणे शक्य होईल आणि आमच्या ग्राहकांना वीजपुरवठ्याचा जागतिक दर्जाचा अनुभव देणेही शक्य होईल.’

टाटा कम्युनिकेशन्समधील इंटरनेट ऑफ थिंग्ज विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख व्ही. एस. श्रीधर म्हणाले, ‘इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये आपली आयुष्ये अधिक तणावमुक्त करण्याची, उत्पादनक्षमता वाढवण्याची, ऊर्जेचा वापर कमी करण्याची, आरोग्यसेवा सुधारण्याची आणि नवीन चाकोरीबाह्य व्यवसाय प्रारूपे तयार करण्याची शक्ती आहे. कायमस्वरूपी जोडल्या गेलेल्या अब्जावधी ‘वस्तूं’च्या (थिंग्ज) रूपांतरण क्षमतेचा अधिकाधिक लाभ घेणे लोकांना, व्यवसायांना आणि संपूर्ण समाजाला शक्य व्हावे म्हणून, आम्ही, टाटा कम्युनिकेशन्सने, भारतात ‘आयओटी’च्या मोठ्या प्रमाणात वापराचा पाया घालण्यासाठी जगातील सर्वांत मोठे आयओटी LoRa नेटवर्क तयार केले आहे. ‘सीएसएस’ सोल्युशन तयार करण्यासाठी आणि भारतात या क्रांतीला वेग देण्यासाठी टाटा पॉवरसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी म्हणजे आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link