Next
अक्षय ऊर्जा निर्मितीत भारताची आघाडी
प्रेस रिलीज
Tuesday, August 28, 2018 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : जागतिक पातळीवर अक्षय ऊर्जेच्या निर्मितीमध्ये भारताने आघाडी घेतली असून, २०१८च्या पूर्वार्धात स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील गुंतवणूक गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढली आहे. भारताची प्रगती अशीच कायम राहिल्यास २०२० पर्यंत चीनला मागे टाकून भारत या बाजारपेठेवर आपले वर्चस्व निर्माण करेल. असा निष्कर्ष ‘ब्लुमबर्ग न्यू एनर्जी फायनान्स’ने ((बीएनईएफ) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

याच कालावधीमध्ये चीनमधील गुंतवणुकीत, मात्र १५ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्वच्छ अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये भारताने अव्वल स्थानावर पोचण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्यामध्ये २०२२ पर्यंत एक लाख ७५ हजार मेगावॉट अक्षय ऊर्जेच्या निर्मितीचे भारताचे लक्ष्य आहे. त्यामुळे भारताच्या अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रामधील गुंतवणुकीत सध्या झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी पारंपारिक पद्धतीने ऊर्जा निर्मिती करणाऱ्या स्त्रोतांपेक्षा अक्षय ऊर्जा निर्मितीच्या स्त्रोतांमध्ये भारताकडून भर पडली. 

या वर्षीच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये एक हजार ५४१ मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती झाली. गेल्या वर्षीच्या तिमाहीत वीजनिर्मितीचा हा आकडा एक हजार ५९ मेगावॉट एवढा होता. ‘फीड इन टेरिफ’ (एफआयटी)वरून स्पर्धात्मक बोलीसाठीचा पवन ऊर्जा निर्मितीक्षेत्राचाही कठीण काळ आता मागे पडला आहे. ३० जून २०१८ पर्यंत भारतामधील ग्रीड जोडणीद्वारे निर्माण झालेल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये ७१ हजार ३२५ मेगा वॉट ऊर्जेची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्रीय नवीन अक्षय ऊर्जा मंत्रालयाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. पवन ऊर्जा प्रकल्पांद्वारे ३४ हजार २९३ मेगावॉट, तर सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे २३ हजार २३ मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठीची यंत्रसामग्री जमीन आणि इमारतींच्या छतावर करण्यात आली आहे. 

२०१७च्या आर्थिक वर्षामध्ये भारताने सर्वाधिक म्हणजे पाच हजार ४०० मेगावॉट एवढी पवन ऊर्जा निर्मिती केली. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रामधील स्पर्धात्मक बोली, कमी वीजदर आणि जीएसटी असे मुद्दे असूनही, भारताने अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी नोंदवली. २०१८च्या पूर्वार्धामधील वीज निर्मितीच्या आकड्यांवरून भारताने या क्षेत्रासाठीच्या कठीण काळावर मात केली असल्याचे स्पष्ट होते. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये २०२० या आर्थिक वर्षापासून केंद्र; तसेच राज्य पातळीवर दहा ते १२ हजार मेगावॉट या क्षमतेमधील प्रकल्पांचा लिलाव होणार आहे. ‘सुझलॉन एनर्जी’सारख्या नोंदणीकृत कंपनीला भारत, तसेच भारताबाहेरील पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी स्पर्धा करण्यासाठी ही चांगली वेळ असून, त्यात त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. सेंबकॉर्प इंडियासारख्या कंपनीच्या ‘आयपीओ’मुळे भांडवली बाजारातही काही घडामोडींची शक्यता आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search