Next
अंतराळविश्वात पुन्हा एकदा भारताचा जयघोष!
‘एमिसॅट’ आणि २८ परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
BOI
Monday, April 01, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this article:

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने एक एप्रिल २०१९ रोजी अंतराळ क्षेत्रात आणखी उंची गाठणारी कामगिरी केली. शत्रूची रडार यंत्रणा ओळखण्यासाठी लष्कराला मदत करण्याच्या उद्देशाने तयार केलेला ‘एमिसॅट’ हा उपग्रह आणि अन्य देशांचे २८ उपग्रह घेऊन पीसीएलव्ही सी-४५ हा प्रक्षेपक अवकाशात झेपावला. अवघ्या दोन तासांत सर्व उपग्रह योग्य त्या कक्षेत स्थिरावले आणि कामगिरी फत्ते झाली. श्रीहरिकोटा येथील तळावरून सकाळी नऊ वाजून २७ मिनिटांनी हे प्रक्षेपण झाले.

‘एमिसॅट’ हा उपग्रह संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात ‘डीआरडीओ’ने विकसित केला आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हेरगिरी करणारा हा उपग्रह असून, शत्रूची रडार यंत्रणा ओळखण्याचे महत्त्वाचे काम तो करणार आहे. उड्डाणानंतर अवघ्या १७ मिनिटांत पृथ्वीपासून ७५३.६ किलोमीटरच्या उंचीवरच्या कक्षेत हा उपग्रह यशस्वीपणे पोहोचवण्यात आला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे मोजमाप हा उपग्रह करणार आहे. 

या मोहिमेत अमेरिकेचे २४, लिथुआनियाचे दोन आणि स्वित्झर्लंड व स्पेनचा प्रत्येकी एक असे एकूण २८ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. या २८सह भारताने आतापर्यंत २९७ परदेशी उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले आहेत. 

‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले असून, ‘चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत ‘इस्रो’तर्फे तीस मोहिमा राबविल्या जाणार आहेत,’ असे त्यांनी सांगितले. त्यात रिसॅट, कार्टोसॅट या उपग्रहांसह चांद्रयान-२चा समावेश आहे.

या मोहिमेची वैशिष्ट्ये :
- पीएसएलव्ही-सी ४५ या प्रक्षेपकाचे ४७वे उड्डाण. 
- या प्रक्षेपकाच्या दीर्घ काळाच्या मोहिमांपैकी एक. मोहीम सुमारे तीन तास चालली.
- प्रक्षेपकाला प्रथमच चार वेगवेगळे बूस्टर्सही जोडले होते.
- प्रक्षेपकाने प्रथमच तीन वेगवेगळ्या कक्षांमध्ये उपग्रह प्रक्षेपित केले.
- एकूण मोहीम चार टप्प्यांची. त्यातील पहिल्या तीन टप्प्यांत उपग्रह संबंधित कक्षांत सोडण्यात आले.
- चौथा टप्पा पुढील सहा महिने सुरू राहणार असून, या कालावधीत पृथ्वीभोवती परिभ्रमण करताना सोबत असलेल्या तीन शास्त्रीय उपकरणांच्या आधारे माहिती गोळा करून पृथ्वीवरील केंद्राला पाठवली जाणार आहे. 
- चौथ्या टप्प्यात सोलार पॅनेल्सचाही वापर होणार.
- मोहिमेदरम्यान प्रक्षेपकाचे इंजिन थोड्या वेळासाठी बंद करून चार वेळा नव्याने सुरू करण्यात आले. (मल्टिपल बर्न टेक्नॉलॉजी) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dinkar Prabhudesai About 138 Days ago
"Heartily Congratulations "!!! and wishing you All the Best forever.
0
0

Select Language
Share Link
 
Search