Next
डॉ वसंतराव देशपांडेंच्या जन्मशताब्दी महोत्सवाला प्रारंभ
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 05:58 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : शास्त्रीय संगीतातील रत्न म्हणून ख्याती असलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते रवींद्र नाट्यगृहात करण्यात आली. 

हा सोहळा त्यांचे लाडके शिष्य व संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये व दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय) भारत सरकार यांच्या संयोजनाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी अच्युत गोडबोले, पंडित शंकर अभ्यंकर, श्रीमती फैयाज, राजू हळदणकर, रवींद्र आवटी, निलय वैद्य, सुरेश महाजन, सुरेश खरे आणि दीपक कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात ग्वालेर घराण्याच्या नुपूर गाडगीळ यांनी राग भीपालासीने केली. त्यानंतर डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील लेख, दुर्मिळ फोटो, त्यांचे पत्र समाविष्ट असलेल्या ‘नक्षत्र वसंत’ स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मान्यवरांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी, विनोद बुद्दी, संगीतातली वैविध्य, हरहुन्नरीपणा आदी यांच्या आठवणीना उजाळा दिला.


पंडित लिमये म्हणाले, ‘कलागुणांना योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळाले, तर त्यांना पुढे येण्यासाठी वेळ लागत नाही यासाठी आजवर अनेक होतकरू, गुणवान कलाकारांना मी माझ्या संस्थेच्या रंगमंचावरून संधी दिली आहे व यापुढेही देण्याचा प्रयत्न करीत राहीन. ‘कट्यार’मध्ये खाँसाहेबांच्या तोंडी एक वाक्य आहे ‘आमच्या नंतरही आमची गायकी (गादी) पुढे चालू रहावी ही आमची दुसरी मुराद आहे’ आणि ती प्रत्यक्ष जीवनात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या नंतर मी त्याच नाटकात खाँसाहेबांची भूमिका करून सिद्ध केलेली आहे आणि गायकीच्या बाबतीत त्यांची गायकी पुढे नेण्याचे काम मी माझ्या शिष्यांना शिकवून पूर्ण करीत आहे.’ या वेळी लिमये यांनी डॉ. देशपांडे यांचा आजवरचा संगीत प्रवासावर डॉक्युमेन्ट्र बनविण्याचा मानस व्यक्त केला.


या नंतर ‘वसंत बहार’ हा डॉ. देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम पं. लिमये यांनी आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर केला. या कार्यक्रमात डॉ. देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत आदी सादर करण्यात आली. यात पं. लिमये यांचे शिष्य कैवल्य केजकर यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘सुरत पियाकी’ या नाट्यगीताने प्रेक्षकांची दाद मिळवली.  

डॉ. देशपांडे हे अतिशय बुद्दिमान, रसिले व नाविन्याचा शोध घेणारे होते या शब्दांत संगीत विदुषी गायिका प्रभा अत्रे यांनी वर्णन केले. कार्यक्रमाची सांगता संगीत विदुषी गायिका प्रभा अत्रे यांच्या जोगकंस, तराना व राग भैरवीने झाली. आपल्या सादरीकरणाने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search