Next
‘आयएसटीई’तर्फे ‘डीकेटीई’ला पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this storyइचलकरंजी : ‘डीकेटीई’ संस्थेला दिल्लीतील एनबीए अ‍ॅक्रिडिटेशन बोर्डकडून सर्व अभ्यासक्रमांना मानांकन मिळाल्याबद्दल इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशनने (आयएसटीई) आयोजित केलेल्या १९व्या वार्षिक राज्यस्तरीय प्राध्यापक मेळाव्यामध्ये ‘डीकेटीई’ला ‘एनबीए अचिव्हमेंट’ या पुरस्काराने गौरविले.

‘डीकेटीई’च्या सर्व अभ्यासक्रमांना एनबीए अ‍ॅक्रिडिटेशन बोर्डकडून मानांकन मिळालेले आहे. यापूर्वीही ‘एआयसीटीई’कडून दोन वेळा ‘बेस्ट इंडस्ट्री- लिंकड् टेक्निकल इन्स्टिटयूट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; तसेच ‘डीकेटीई’मध्ये विद्यार्थ्यांना संशोधनात्मक कार्य करण्यासाठी उपलब्ध ५० कोटींची उपकरणे, इंडस्ट्रीजशी व माजी विद्यार्थ्यांशी असलेले उत्तम इंटरअ‍ॅक्शन, विद्यार्थी कल्याणासाठी केलेले विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्याशी शैक्षणिक व औद्योगिक सामंजस्य करार, सेमिनार, वर्कशॉप व कॉन्फरन्स, गेली ३५ वर्षे सातत्याने टेक्स्टाइल विभागामध्ये होत असलेल्या १०० टक्के प्लेसमेंट या सर्व कार्याची दखल घेत ‘आयएसटीई’ने या पुरस्कारासाठी ‘डीकेटीई’ची निवड केली. ठाणे येथे झालेल्या १९ व्या आयएसटीई वार्षिक राज्यस्तरीय प्राध्यापक मेळाव्यामध्ये ‘डीकेटीई’ला पुरस्कार प्रदान केला.

या पुरस्काराविषयी बोलताना संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले म्हणाले, ‘एनबीए ही महाविद्यालयांना मानांकन देणारी स्वायत्त संस्था आहे. ‘एनबीए’ने दिलेल्या मानांकनाला देशातील शिक्षण प्रणालीमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे. या मानांकनामुळे विद्यार्थी, पालक, इंडस्ट्रीज व एकूण समाजालाच उत्कृष्ट शिक्षणाची हमी मिळत असते. या मानांकनाचा ‘आएसीटीई’ने गौरव केल्यामुळे ‘डीकेटीई’ला भविष्यात सर्व अभ्यासक्रमांना अव्वल गुणवत्ता धारण करण्यास मदत होईल.’

हा पुरस्कार ‘आयएसटीई’चे चेअरमन प्रतापसिंह देसाई, व्हाइस चेअरमन डॉ. ए. पी. पुनिया, डीटीई महाराष्ट्रचे डायरेक्टर डॉ. अभय वाघ, ‘आयएसटीई’चे एक्झिक्युटीव्ह सेक्रेटरी प्रा. व्ही. डी. वैद्य आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. ‘डीकेटीई’तर्फे सिव्हिल इंजिनीअर विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. बी. चौगुले आणि ‘आयएसटीई’ कोऑर्डिनेटर प्रा. पी. एस. गोरे यांनी पुरस्कार स्विकारला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link