Next
मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
BOI
Monday, May 27, 2019 | 05:19 PM
15 0 0
Share this article:

भिवंडी : भांडुप येथील विकास प्रबोधिनी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय ‘युवा उत्कृष्ट पत्रकारिता २०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

विकास प्रबोधिनीतर्फे २६ मे रोजी डोंबिवलीतील केडीएमसी पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित केले होते. याचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल शिंदे यांनी भूषविले. या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, विकास प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष साहित्यिक श्रीकृष्ण टोबरे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते जाधव यांना गौरविण्यात आले.

मिलिंद जाधव हे भिवंडी तालुक्यातील पडघा या ग्रामीण भागात राहत असून, त्यांनी साठेय महाविद्यालयातून  पत्रकारितेमधून पदव्युत्तर पदविका मिळवली आहे. ते विविध वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करतात. त्यांचा  सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो.  विविध सामाजिक कार्यक्रमांतून ते आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करतात. विविध कवी, साहित्य संमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग असून, विविध विषयांवरील प्रबोधनात्मक कविताही त्यांनी वर्तमापत्रातून प्रकाशित केल्या आहेत. अनेक कार्यक्रमांत त्यांनी सूत्रसंचालकाची धुराही सांभाळली आहे. 

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेतर्फे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भिवंडीतील पत्रकार संतोष चव्हाण, नितीन पंडित, समाज विकास मंडळ समतानगर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग व साठेय महाविद्यालयाचे माध्यम विभाग प्रमुख प्रा. गजेंद्र देवडा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search