Next
हसा आणि आनंदी राहा!
प्रसन्न पेठे
Wednesday, June 20, 2018 | 09:22 AM
15 0 0
Share this story

आयुष्य मजेत जगण्यासाठी हसतमुख राहणं फार महत्त्वाचं असतं. नकारात्मकता चहूबाजूंनी अनेक माध्यमांतून आपल्यावर कोसळत असताना, सकारात्मकतेने जीवनाला सामोरं जाणं अत्यावश्यक आहे. सकारात्मकता अंगी बाणवण्यासाठी छानपैकी खळखळून हसणं हे फार जरूरीचं आहे. ‘हसरे जग - भाग १ आणि २’ हे दोन भाग लिहून मारुती यादव यांनी वाचकांना खुदू खुदू ते खो खो हसण्यासाठी एक मोठाच स्रोत समोर आणून ठेवला आहे. त्या पुस्तकांबद्दल...
..............
प्रामुख्याने ‘सकाळ’ या दैनिकात विनोदी किस्से, कथा आणि लेख सातत्याने लिहिणाऱ्या मारुती यादव यांनी त्या लेखांचं, कथांचं आणि किश्श्यांचं संकलन पुस्तक रूपाने (दोन भागांत) वाचकांसमोर आणलं आहे. त्यातले विनोद, किस्से आपलं निश्चितच मनोरंजन करतात यात शंका नाही.
 
खळखळून हसणे ही खरं तर अनमोल ईश्वरी देणगी. हसरा चेहरा कुणला आवडत नाही? प्रत्येक जण दुर्मुखलेला चेहरा टाळून हसऱ्या चेहऱ्यांचा सहवास नकळतच शोधत असतो. मागे प्रख्यात विनोदमूर्ती शरद तळवलकर यांनी ‘ज्या वाक्याला किंवा कृतीला माणूस काहीही कल्पना नसताना एकदम खळखळून हसतो तो खरा श्रेष्ठ विनोद’ अशी विनोदाची व्याख्या केली होती. यादव यांनी म्हटलंय, ‘प्रपंचाच्या धबडग्यात, ताणतणावाखाली जगत असताना आपण मनसोक्त, मनमुराद आणि दिलखुलास हसायचं विसरत चाललो आहोत... विनोदामुळे फुललेल्या हास्याच्या फवाऱ्यांनी आपल्या मनात साचून राहिलेला ताणरूपी मळ नाहीसा होतो..’

मारुती यादव यांनी पुस्तकाच्या दोन भागांतून शेकडो हास्यस्फोटक किस्से, धमाल विनोदी लेख आणि खुसखुशीत कथा यांचा नजराणा देऊन, वाचक पुरेपूर हसतील आणि त्यांच्या आयुष्यातल्या चार घटका अत्यंत मजेत, हसत जातील, याची पुरेपूर ग्वाही दिलेली आहे.  

त्यामुळे हे दोन्ही भाग जरूर वाचावेत, असेच आहेत! 

पुस्तक : हसरे जग - भाग १ आणि २    
लेखक : मारुती यादव    
प्रकाशक : अनुराधा प्रकाशन, रोहिणी, डीएसके विश्व, सिंहगड रोड, पुणे ४११०४१  
संपर्क : ९८८१२ ५४४०८   
पृष्ठे : १२८ (भाग १) आणि ११२ (भाग २) 
मूल्य : १५० ₹ (प्रत्येकी) 

(‘हसरे जग - भाग १ आणि २’ ही पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link