Next
मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘कोरडा दिवस’
मद्यविक्रीस मनाई करण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश
प्रेस रिलीज
Saturday, March 30, 2019 | 01:04 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून, तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे,’ असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.

निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भर वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. मतदानापूर्वीचे ४८ तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे २४ तास मद्यविक्री करण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

तीन दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१च्या कलम १३५(सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघामध्ये एकूण चार टप्प्यांत मतदान प्रक्रिया होणार आहे. ११ एप्रिलला सात मतदारसंघांसाठी, १८ एप्रिलला रोजी १० मतदारसंघांसाठी, २३ एप्रिलला १४ मतदारसंघांसाठी आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search