Next
शिर्डीतून मार्चअखेर विमान उड्डाणाचे संकेत
प्रभात
Friday, February 17, 2017 | 01:43 PM
15 0 0
Share this article: काकडी विमानतळाची पाटील यांच्याकडून पाहणी

मुंबई, दिल्ली, पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद फेऱ्या

शिर्डी - अनेक वर्षांपासून सुरु होण्याची प्रतीक्षा असलेले शिर्डी विमानतळ मार्चअखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची डेडलाइन विमानतळाच्या ठेकेदारांना देण्यात आली आहे. मार्चअखेर विमानसेवा सुरू होण्याचे संकेत विमान प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिले.

शिर्डी विमानतळाच्या कामाचा बुधवारी दुपारी आढावा घेण्यात आला. राज्याचे सामान्य प्रशासनाचे प्रधान सचिव श्‍यामलाल गोयल, विमान प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विश्‍वास पाटील, जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रांताधिकारी कुंदनकुमार सोनवणे, जयश्री कटारे, लोणारी यांच्यासह प्रशासकिय अधिकारी आणि ठेकेदार यावेळी उपस्थित होते.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे धावल्यानंतर आता लवकरच शिर्डी विमानतळावरुन विमान उड्डाण करण्याचे संकेत मिळाले आहेत.

काकडी येथे विमानतळाच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष पाटील म्हणाले, आम्ही आज शिर्डीत येऊन विमानतळाची कामाची पहाणी करण्यासाठी आलो आहोत. कामे जोरदारपणे सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विमानसेवा लवकर सुरू करण्याबाबत आग्रह आहे. आम्ही त्याप्रमाणे सर्व काम लवकरच पूर्ण करणार आहोत. विमानसेवा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आम्ही आहोत. सध्या विमानतळावरील मनोऱ्यांची कामे सुरु आहेत. टर्मिनसचे बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर विमानतळाच्या पार्किृंचेही काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे शिर्डीस जोडणाऱ्या काकडी-शिर्डी रस्त्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. या कामाचा आढावा आम्ही घेतला आहे. जवळपास 75 टक्के कामे झालेली आहेत. यासाठी लागणाऱ्या मंजुऱ्याही बहुतांशी प्रगतीपथावर आहेत, असेही त्यांनी सांगितले.

काकडी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे विमानतळाची ही सर्व कामे करणाऱ्या ठेकेदारांना 15 मार्चच्या डेडलाईनपर्यंत काम पूर्ण करून द्यायचे आहेत. विमानतळाचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे साधारणपणे मार्चअखेर विमानतळाचे उद्‌घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. झाले तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विमानाची धावपट्टी नक्कीच सुरू होईल, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यक्‍त केला. शिर्डी ते मुंबई, दिल्ली, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अशा फेऱ्या या विमानतळावरुन सुरु करण्यात येणार आहेत.


पंतप्रधानांसाठी आग्रही आहोत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात होत असलेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गुंतलेले आहेत. परंतु याबाबत आमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. निवडणुकांचे काम संपल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्‌घाटनासाठी येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search