Next
‘एहसास’तर्फे ‘ताल-तबला’ कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Thursday, January 31, 2019 | 01:34 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील ‘एहसास’ या संस्थेतर्फे ‘एक रंग एक रूप’अंतर्गत ‘ताल-तबला’ हा कार्यक्रम रविवारी (तीन फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर केला जाणार आहे. 

‘ताल’ या मालिकेतील ‘वेस्टर्न हिदाम’ व ‘ढोलक-ढोलकी’ या कार्यक्रमांनंतर आता तबल्याच्या तालाने सजलेली जुनी हिंदी चित्रपट गीते या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. मधुरा दातार, अली हुसेन व सई टेंभेकर हे गायक कलाकार यामध्ये सहभागी होणार असून वाद्यवृंद संयोजन केदार परांजपे यांचे आहे. निवेदन मंगेश वाघमारे करणार आहेत, तर ध्वनी व्यवस्था नीलेश यादव यांची आहे.

कार्यक्रमाची संकल्पना गोपाळ दामले व प्राची धरमसी यांची असून या कार्यक्रमास प्रवेशमूल्य ठेवण्यात आले आहे.

‘एहसास’ ही संस्था गेली १३ वर्षे सातत्याने जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम करत आहे. या वर्षीपासून प्राची धरमसी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवोदित गायिकेला ‘स्वर एहसास’ हा पुरस्कार दिला जाणार असून रुपये पाच हजार रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षीचा हा पुरस्कार मालविका दिक्षित हिला सदर कार्यक्रमादरम्यान दिला जाणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link