Next
गोंडवाना विद्यापीठात मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, February 23, 2019 | 12:57 PM
15 0 0
Share this story



गडचिरोली : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरोथान स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कल्याणकर, प्र.कुलगुरू डॉ. भुसारी, कुलसचिव डॉ. मोहर्ले, जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, तसेच डॉ. ताराम, जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी महेश भांडेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गडचिरोली उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवातला शपथग्रहणाने तसेच डॉ. कल्याणकर व डॉ. अनिल रुडे यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.

समारोप कार्यक्रमात डॉ. रुडे यांनी एचआयव्ही एड्सविषयी माहिती देताना आहार-विहार व विचार या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनतर डॉ. कल्याणकर यांनी ‘एचआयव्ही एड्सविषयी युवकांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. युवा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलींमध्ये पायल लेनगुरे हिने, तर मुलांमध्ये विनोद मुत्तेलवार याने प्रथम क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमाला डॉ. नरेश मडावी, डॉ. लोखडे, प्रा. उईके, जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच इतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मडावी यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link