Next
हिमायतनगरात रामजन्मोत्सव साजरा
बजरंग दलाच्या बाइक रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले
नागेश शिंदे
Monday, April 15, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर :
शहरातील श्रीराम मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, परमेश्वर मंदिर, साई मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिरासह शहर तालुक्यातील सर्वच देवी-देवतांच्या मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला (१३ एप्रिल) प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने येथील बजरंग दल शाखेच्या युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य बाइक रॅली काढली. 



दुपारी १२ वाजता शहरातील सर्वच देवी-देवतांच्या मंदिरात रामनामाचा जप करीत प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनचरित्रावर आधारित भक्तिगीते महिला व पुरुष मंडळींनी सादर केली. बजरंग दलाच्या युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रभू रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करून मोटरसायकल रॅली काढली. युवकांनी भगवे झेंडे घेऊन रॅलीत सहभाग नोंदविला होता. 



या वेळी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीराचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष कुणाल राठोड, राम नरवाडे, विठ्ठल ठाकरे, संतोष गाजेवार, बजरंग दलाचे गजानन चायल, अमोल धुमाळे, बंडू अनगुलवार, देविदास शिंदे, यांच्यासह शेकडो युवकांनी सहभाग घेतला होता. ही मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने निघून परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर समारोप करण्यात आला. मंदिराच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या युवकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महावीराचंद श्रीश्रीमाळ यांच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या युवकांना मिठाई देऊन रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search