Next
पुण्यात झाली ‘गुंतागुंतीच्या लैंगिक प्रवृत्ती’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद
BOI
Saturday, October 12, 2019 | 01:54 PM
15 0 0
Share this article:

डॉ. क्वॉऊस बायर मार्गदर्शन करताना

पुणे : येथील किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल रिसर्च सेंटर (केईएमएचआरसी) आणि बायर इंडिया यांच्या वतीने ‘ऑनलाइन आवडी-निवडी, ऑफलाइन परिणाम : डिजिटल जगातील गुंतागुंतीच्या लैंगिकतांमधून वाट काढताना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेत डॉ. टी. एस. एस. राव, डॉ. मृगेश वैष्णाव, डॉ. हरिश शेट्टी, डॉ. नितीन आनंद, रोहित श्रीवास्तव, एन. एस. नप्पीनाई, सोनाली पाटणकर, डॉ. सुमित नरूला आणि डॉ. बायर यांनी या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन केले.
  
जर्मनीतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजी अँड सेक्शुअल मेडिसीन’चे संचालक डॉ. क्वॉऊस बायर म्हणाले, ‘वैद्यकीय विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील लैंगिक हिंसाचारावरील प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याचे ‘पीपीपीएसव्ही’चे ध्येय आहे. २००५ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजी अँड सेक्शुअल मेडिसीन’ने यासाठी एक प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प आता जर्मनीबाहेरील देशांमध्येही राबवण्यात येत आहे. याद्वारे हेबेफिलियाने पीडित लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातात.’  

पुण्यातील केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालक डॉ. लैला गार्डा म्हणाल्या, ‘घटना घडण्यापूर्वीच त्या घटनेला प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांनी स्वतःमधील पिडोफिलियाच्या प्रवृत्ती ओळखल्या आहेत, ज्यांना कृती करण्यापासून स्वतःला थांबवण्याची इच्छा आहे आणि ज्यांच्या हातून अद्याप गुन्हा घडलेला नाही अशा लोकांवर प्रतिबंधात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून उपचार करण्यात येतील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत होईल आणि त्याव्दारे मुलांविरोधातील लैंगिक गुन्हे कमी होतील.’

‘पिडोफिलियाच्या रुग्णांना मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय उपचार देऊन त्यांना गुन्हा करण्यापासून रोखण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे यासाठीचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत,’असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात काढले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search