Next
तीन महिन्यांच्या बालकावर अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 03:00 PM
15 0 0
Share this story

हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या शिवांश सावंत, आईसह  आणि ओएनपी हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. अमिता फडणीस आणि अन्य सहकारी

पुणे : केवळ तीन महिन्यांच्या आणि साडे चार किलो वजनाच्या बालकावर अत्यंत अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यात येथील ‘ऑयस्टर अँड पर्ल’ (ओएनपी प्राईम) रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ओएनपी रुग्णालयाच्या संचालिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, ‘मूल जितके लहान आणि कमी वजनाचे तितकी हृदयावरील शस्त्रक्रियाही अवघड आणि धोक्याची समजली जाते. ओएनपी रुग्णालयात अवघ्या तीन महिन्यांच्या बाळावर अशी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. सर्जन डॉ. श्रीनिवास किनी यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. यशदीप कळमनकर व डॉ. प्रसाद बाल्टे यांचा शस्त्रक्रियेसाठीच्या चमूत सहभाग होता.’ 

‘सांगलीतील वाळवा तालुक्यात राहणाऱ्या शिवांश सावंत या तीन महिन्यांच्या बाळाला हृदयाचे ठोके वाढण्याचा आणि धाप लागण्याचा त्रास होता, परंतु त्याला हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे काळेनिळे पडणे किंवा छातीत दुखणे अशी इतर काही लक्षणे दिसत नव्हती. जंतूसंसर्गामुळे शिवांशच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि त्याच वेळी ‘टू डी एको’ चाचणीत त्याच्या हृदयात ‘टोटल अॅनोमालस पल्मोनरी व्हेनस रीटर्न’ (टीएपीव्हीआर) हा दोष असल्याचे समजले. त्यामुळे त्याच्या हृदयाला योग्य प्रकारे रक्तपुरवठा होत नव्हता. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते;मात्र शिवांशचे वय केवळ तीन महिने असल्याने आणि त्याचे वजनही १० किग्रॅपेक्षा कमी असल्यामुळे ही शस्त्रक्रिया धोक्याची होती. हे आव्हान डॉक्टरांनी उत्तमरित्या पेलले. नऊ जूनला त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि १६ जूनला शिवांशला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून, आता त्याची प्रकृती उत्तम आहे. इतक्या लहान बाळाच्या शस्त्रक्रियेनंतरही त्याची अत्यंत काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते आणि कोणत्याही प्रकारच्या जंतूसंसर्गापासून रुग्णाला कटाक्षाने दूर ठेवावे लागते. या सगळ्यात  आम्हाला यश आले आणि आम्ही एका छोट्या बाळाचा जीव वाचवू शकलो’, असे डॉ. फडणीस यांनी सांगितले.
 
त्या पुढे म्हणाल्या, ‘अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी ५.५ ते ६ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो;मात्र, शिवांशचे पालक मजुरी करणारे असून, रुग्णालयाने शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सिद्धिविनायक ट्रस्टकडून निधी गोळा करण्यास मदत केली आणि शस्त्रक्रिया मोफत केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link