Next
सरस्वतीबाई दादासाहेब फाळके नारी शक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण
प्रेस रिलीज
Thursday, April 25, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:


पुणे : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या कर्तुत्ववान पत्नीच्या नावाने देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा नारी शक्ती सन्मान सरस्वतीबाई दादासाहेब फाळके पुरस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) प्रा. धनश्री सरदेशपांडे यांना नुकताच मुंबईत प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणार्‍या देशभरातील १५ निवडक नामवंत महिलांचा त्यात समावेश आहे. या पुरस्कारार्थींमध्ये  प्रा. सरदेशपांडे यांच्यासह तीन पुणेकर माहिलाही आहेत.

आपल्या पतीच्या चित्रपट बनवण्याच्या ध्यासासाठी काम करणार्‍या पहिल्या महिला उद्योजक, निर्मात्या, आर्थिक मदत करणार्‍या आणि चित्रपट निर्मितीतील कुशल तंत्रज्ञ अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका सरस्वतीबाईंनी तेव्हा साकारल्या होत्या. त्यांच्या या कर्तृत्वाला साजेसे असणार्‍या आदर्श, कर्तृत्ववान महिलांसाठी हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ट्रान्स एशियन चेंबर अ‍ॅंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय भिडे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. या वेळी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर उपस्थित होते. या पुस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.

प्रा. सरदेशपांडे यांच्यासह पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व गायिका डॉ. माधुरी कश्यप आणि मतीमंद मुलांसाठी काम करणार्‍या साधना गोडबोले यांनाही गौरवण्यात आले. इतर पुरस्कारार्थींमध्ये झोपडपट्टीत काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे, जपानी सिनेऑटोग्राफर केईको नाकाहारा तसेच फॅशन डिझायनर अर्चना कोचर आदींचा समावेश आहे.

प्रा. सरदेशपांडे या ‘बीएनसीए’तील डिजिटल आर्किटेक्चर विभागप्रमुख असून, त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा विषय आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विषय प्रथमच ‘बीएनसीए’मध्ये सुरू केला. यात ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांचे भक्कम मार्गदर्शन त्यांना लाभले. यातून डॉ. कश्यप आणि प्रा. सरदेशपांडे यांनी देशात पहिली डिजिटल आर्किटेक्चर या विषयावरील व्यापक संशोधनसाठी एक अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा सुरू केली. त्याआधारे येथे अनेक नवी व सर्जनशील कामे सातत्याने चालू आहेत.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून प्रा. सरदेशपांडे म्हणाल्या, ‘डॉ. कश्यप यांच्या मार्गदर्शनामुळेच ते शक्य झाले. या पुरस्काराच्या निमित्ताने तंत्रज्ञान व स्त्रिया यांचा एकमेकांशी काहीही संबंध असा प्रचलित गैरसमज दूर होण्यास मदत होईल. आजच्या काळाशी सुसंगत असणार्‍या डिजिटल आर्किटेक्चरमधील स्त्री सहभाग हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. हे स्त्रीशिक्षणाचे प्रणेते धोंडो केशव कर्वे यांच्या ध्येयाशीही ते सुसंगत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search