Next
‘डीकेटीईचे शिक्षण व संशोधन अद्वितीय’
डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, March 12, 2019 | 04:09 PM
15 0 0
Share this storyइचलकरंजी : ‘डीकेटीईचे शिक्षण आणि संशोधन देशात अलौकीक आहे. यामुळेच देश-विदेशांत या संस्थेचे नाव आघाडीवर आहे,’ असे उद्गार ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी काढले.

येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटच्या पहिल्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘डीकेटीई’च्या इतिहासातील पहिला पदवीप्रदान सोहळा मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी भूषविले. या वेळी पद्मश्री बरगे हिला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘इचलकरंजीसारख्या छोट्या शहरात देशातील एक अत्यंत प्रगत तंत्रनिकेतन व अभिंयांत्रिकी शिक्षण देणारी संस्था आहे, याचा प्रसार मी ज्या ठिकाणी जातो तेथे आवर्जून करतो. या ठिकाणी असणारी अत्याधुनिक यंत्र सामुग्री ‘आयआयटी’मध्ये संशोधन करण्यासाठीही उपयोगी ठरते. केंद्र शासनाच्या संशोधन विभागामार्फत अनेक महत्त्वाच्या संशोधनाचे काम या संस्थेला दिले जाते. या ठिकाणी होणारे संशोधन आणि जगभरातील अनेक कंपन्यामध्ये कार्यरत असणारे या संस्थेतील विद्यार्थी यांवरूनच येथील शिक्षणाचा दर्जा स्पष्ट होतो.’
 


हा कार्यक्रम पुलवामातील शहिदांना समर्पित करण्यात आला. या वेळी सैनिकी बँड व त्यासोबत पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर मुख्य संमारंभास सुरवात झाली. या समारंभात शैक्षणिक क्षेत्रातील अनेक तज्ञ मान्यवर उपस्थित होते. ‘डीकेटीई’ला ‘अ‍ॅटोनॉमस स्टेटस’ दर्जा प्राप्त झाल्यानंतर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील पदव्युत्तर पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच बाहेर पडली आहे. यामध्ये एकूण आठ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये ११० विद्यार्थ्यांनी २०१७-१८ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या सर्वांना पदवी बहाल करण्यात आली आहे. २०१७-१८ साली बीटेक-बीई पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनाही पदवी देण्यात आली. प्रथम क्रमांकप्राप्त बीटेक विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
 
शिवाजी विद्यापीठाचे संचालक परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी ‘डीकेटीई’च्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करून विद्यापीठाला ही संस्था अभिमानास्पद वाटते असे म्हटले.  विद्यापीठाचे कुलगुरू सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांनी संस्थेने प्राचार्य व प्राध्यापक यांना शैक्षणिक नियोजनासाठी दिलेले स्वातंत्र कौतुकास्पद असल्यामुळेच याठिकाणचे प्राध्यापक देश आणि विदेशात चांगले कार्य करीत असल्याचे सांगितले.‘डीकेटीई’चे उपाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सद्यस्थितीत ‘डीकेटीई’मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे अद्यावत शिक्षण व परेदेशातील प्रशिक्षणाबाबत माहिती सांगून उत्तम भवितव्य घडण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले. डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन संस्थेने हाती घेतलेल्या विविध उत्कृष्ट व अभिनव कार्यपद्धतीची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच नेतृत्व गुण विकसित करून देशाचे भवितव्य घडवण्याचे आवाहन केले.  

या वेळी ‘डीकेटीई’चे खजिनदार आर. व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे, भूपाल कागवाडे यांच्यासह सर्व विश्‍वस्त, ‘आएएसटीई’चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, बोर्ड ऑफ गव्हर्नस, अ‍ॅकॅडमिक कौन्सिल सदस्य, अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य, विद्यापरिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ प्रतिनिधी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी, ‘डीकेटीई’चे डे.डायरेक्टर, डॉ यू. जे. पाटील, डॉ. एल. एस. आडमुठे, परीक्षा नियंत्रक डॉ. आर. ए. पाटील, सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी आदी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. डी. गोखले, सौ. ढंग व सौ. गुरव यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link