Next
‘मी प्रत्येकालाच ‘कौशिकी’च्या सेटवर नेले असेन’
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 01:48 PM
15 0 0
Share this story

सयानी गुप्तामुंबई : एखादे कौशल्य अगदी नीट शिकून घेण्यासाठी कलाकारांना कामाच्या धबडग्यातून वेळच मिळत नाही, ही तर अगदी सर्वसामान्य बाब आहे; मात्र, वियूवरील बहुप्रतिक्षित ‘कौशिकी’ या वेब सिरीजमधील सयानी गुप्तासाठी सहकलाकारांना गाडीत बसवून सेटवर नेण्याचा अनुभव फारच संस्मरणीय आणि मजेचा होता.

सयानी नुकतीच ड्रायव्हिंग शिकली आणि तिला रस्त्यावर गाडी चालवण्याचा सराव करायचा होता. ‘कौशिकी’चा सेट तिच्या घरापासून बऱ्यापैकी दूर होता. ती नुकतीच ड्रायव्हिंग शिकल्याने लांब पल्ल्याच्या अंतरासाठी गाडी चालवण्याचा आत्मविश्वास तिच्यात नव्हता. अशा परिस्थितीत तिचे सहकलाकार तिच्या मदतीला आले.

आपल्या दुविधेबद्दल सयानी म्हणाली, ‘मी नुकतीच ड्रायव्हिंग शिकले आणि अशा अनेक नवशिक्यांप्रमाणे मीसुद्धा या परिस्थितीत लांब अंतर गाडी चालवत जाण्याबद्दल काहीशी साशंक होते. कौशिकीचा सेट २-३ तासांच्या अंतरावर आहे. या प्रवासात ड्रायव्हिंग कौशल्याचा सराव होईल, हे मला माहीत होते. माझ्या घराजवळ राहणारे माझे सह-कलाकार यासाठी तयार झाले आणि त्यांनीदेखील माझ्या ड्रायव्हिंगमध्ये मला साथ दिली. खरे तर आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याची आणि एकमेकांसह एकत्र राहण्याची ही संधीच चालून आली. त्यांनी ड्रायव्हर म्हणून माझ्यावर विश्वास दर्शविला यातच मला समाधान आहे, खरे तर मी अजूनही माझ्या ड्रायव्हिंग कौशल्यावर काम करत आहे.’

‘बहुप्रतिक्षित अशा ‘कौशिकी’मधील माझे काम पाहण्यासाठी २७ एप्रिल रोजी ‘वियू’ नक्की पहा‌,’ असे आवाहन ही सयानीने केले आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link