Next
शाहरुख साकारणार अंतराळवीर राकेश शर्मा
शाहरुखच्या नावावर शिक्कामोर्तब; मुख्य अभिनेत्रीसाठी फातिमा सना शेखच्या नावाची चर्चा
BOI
Tuesday, January 08, 2019 | 04:15 PM
15 0 0
Share this article:


अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर येत असलेल्या बायोपिकबद्दल काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान या चित्रपटात राकेश शर्मांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आरकेएफ प्रोडक्शन’ या चित्रपटाची निर्मिती करणार असून, चित्रपटाचे नाव ‘सारे जहाँ से अच्छा’ असण्याची शक्यता आहे. 

राकेश शर्मा यांच्यावरील जीवनपटाची चर्चा गेले काही महिने सुरू होती, मात्र त्यातील कलाकारांना घेऊन बराच काळ संभ्रमाचे वातावरण राहिले. सुरुवातीला राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी मि. परफेक्शनिस्ट आमीर खान याचे नाव चर्चेत होते. परंतु आमीरने तारखांच्या कारणाने हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि मग शाहरुख खानचे नाव यासाठी समोर आले. आता शाहरुखच्या नावावर जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले आहे; मात्र चित्रपटातील प्रमुख नायिकेच्या बाबतीत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. 

सुरुवातीस प्रियांका चोप्रा, नंतर भूमी पेडणेकर यांची नावे चर्चेत होती. मात्र आता या दोघींनंतर अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे नाव घेतले जात आहे. ते अद्याप पूर्णपणे निश्चित झालेले नसून तिच्यासोबत आणखी काही अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत. आमीरने नकार दिल्याने राकेश शर्मा यांची सुवर्ण कामगिरी पडद्यावर साकारण्याची संधी शाहरुखच्या पदरात पडली आहे. याच वर्षी म्हणजे २०१९मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search