Next
पुण्यात ‘युरोलॉप बेसिक्स टू रोबोटिक्स’ कार्यशाळा
प्रेस रिलीज
Saturday, June 22, 2019 | 10:45 AM
15 0 0
Share this article:

पुणे : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाअंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या युरॉलॉजी विभागातर्फे २२ आणि २३ जून २०१९ रोजी ‘युरोलॉप पुणे बेसिक्स टू रोबोटिक्स’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विद्यापीठाच्या ऑडिटोरियममध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.

या कार्यशाळेत मूत्रविकार उपचारासाठी आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विविध राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत; त्याच प्रमाणे लॅप्रोस्कॉपिक व रोबोटिक या प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने मूत्रविकारातील विविध १८ प्रकारच्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. 

कार्यशाळेविषयी बोलताना डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. पी. साबळे म्हणाले, ‘या कार्यशाळेचा उपयोग उदयोन्मुख सर्जन्सना चांगल्यारीतीने होणार असून, सध्या प्रॅक्टिस करणाऱ्या युरोस्टोलॉजिस्टना यात अलीकडे झालेले बदल समजण्यास मदत होणार आहे. या कार्यशाळेसाठी संपूर्ण देशातून युरोलॉजिस्ट्सचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी त्यांनी या पूर्वीच नोंदणी केलेली आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search