Next
मोटोरोलातर्फे तीन नवीन मोटो मॉड्स
प्रेस रिलीज
Wednesday, December 20 | 12:23 PM
15 0 0
Share this story

मुंबई : 'मोटोरोला'ने भारतातील त्यांच्या प्रमुख मोटो झेड फ्रेंचायजीसाठी तीन नवीन मोटो मॉड्सची घोषणा केली. हे तीन मॉड्स आहेत जेबीएल साउंडबूस्ट टू स्पीकर मॉड, मोटो टर्बोपॉवर पॅक बॅटरी मॉड आणि गेमपॅड मॉड. याद्वारे मोटो झेड, मोटो झेड प्ले किंवा मोटो झेड टू प्ले स्मार्टफोनला हँडहेल्ड गेमिंग कन्सोलमध्ये बदलता येईल, स्मार्टफोनमधून प्रिमिअम जेबीएल साऊंडचा अनुभव घेता येईल किंवा चालताफिरता फोन टर्बो चार्ज करता येईल. तिन्ही मॉड्स डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर आणि सर्व मोटोरोला एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स 'मोटो हब्स'मध्ये उपलब्ध असतील.

मोटो इन्स्टा-शेअर प्रोजेक्टर, हॅसलब्लॅड ट्रू झूम किंवा जेबीएलएच साउंडबूस्ट यांसारख्या पूर्वीच्या डिवाईसप्रमाणे नवीन फंक्शन्सची सुविधा देणारे नवीन मॉड्स हँडसेटच्या मागे चुंबकाप्रमाणे चिपकतात आणि नवीन व प्रगत कार्यक्षमता देतात. ज्यामुळे युजर्सना त्यांची मनोरंजनासंदर्भातील हौस पूर्ण करता येते.

नाविन्यता आणि अद्वितीय ग्राहक अनुभव हे आपले तत्त्व कायम राखत मोटोरोलाने रेन्टोमोजोसोबतच आगळीवेगळी भागीदारी केली आहे. या सहयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना ही नवीन मोटो मॉड्स खरेदी करण्यापूर्वीच त्यांचा अनुभव घेण्याची सुविधा मिळते. ग्राहक २३ डिसेंबरपासून मोटो मॉड्स आठवडाभरासाठी तीनशे ९९ रुपयांमध्ये भाड्याने घेऊ शकतात. ही सेवा अव्वल आठ शहरांमध्ये उपलब्ध असेल आणि ग्राहक या नवीन मोटो मॉड्सचा आनंद व सोईस्कर सुविधांचा अनुभव घेऊ शकतील.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link