Next
‘सूर्यदत्ता’तर्फे ‘ऑरा २०१८’ प्रदर्शनाचे आयोजन
BOI
Thursday, December 20, 2018 | 06:09 PM
15 0 0
Share this story

पुणे : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे अंतर्गत सजावट विषयावरील ‘ऑरा २०१८’ या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदाशिव पेठेत असलेल्या संस्थेच्या परिसरात २८, २९ व ३० डिसेंबर २०१८ असे तीन दिवस हे प्रदर्शन भरणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी, दि. २८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी होणार असून, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सचिव विजय कोल्हे, परांजपे बिल्डर्सचे शशांक परांजपे, इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरिअर डिझाईनचे अध्यक्ष अश्विन लोवेकर, रचनाकार महेश नामपूरकर उपस्थित राहणार आहेत. 

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम, तसेच घर सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू पाहायला मिळतील. यामध्ये सदनिका, बंगला, कार्यालय, बँक, उपहारगृह आदींच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, फर्निचर, त्यासाठी लागणारे आराखडे व संदर्भ या गोष्टींची माहिती सादर करण्यात येणार आहे. या प्रदर्शनादरम्यान मार्गदर्शन व्याख्यानेही होणार आहेत. 

प्रदर्शनाचे हे सोळावे वर्ष असून, आतापर्यंत सेव्हन वंडर्स, लेणी, एकत्र कुटुंबपद्धती, रेल्वे स्टेशन, गॅरेज, चला गावाकडे, सागरी विश्व, राजमहाल अशा विविध संकल्पनांवर प्रदर्शने साकारण्यात आली  आहेत. यंदा ‘तिबेटियन संस्कृती’ या प्रदर्शनातून दाखवण्यात येणार आहे. बौद्ध संस्कृती ही भारतातील उत्तरी क्षेत्रात नावारूपाला आली आहे. उत्तर भारतातील संस्कृती, शिल्पकला दाखविण्याचा प्रयत्न मुलांनी केला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
(०२०) २४३३०४२५, ९८५०८ ११९९६ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link