Next
संगमेश्वरी बोली आता वेबसीरिजच्या व्यासपीठावर
BOI
Sunday, September 01, 2019 | 11:32 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या संगमेश्वरी बोलीचा आनंद आता वेबसीरिजच्या माध्यमातून घेता येणार आहे. ‘अक्रित झो.. मरनाच्या भायेर बेफाट’ ही संगमेश्वरी बोलीतील पहिली वेबसीरिज लवकरच भेटीला येत आहे. या सीरिजचे शीर्षक आणि शीर्षकगीताचे अनावरण एक सप्टेंबरला रत्नागिरीत झाले. गेल्या तीन वर्षांत दोनशे प्रयोगांचा पल्ला गाठून रसिकप्रिय झालेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याच्या टीमतर्फे ही वेबसीरिज सादर केली जाणार आहे. येत्या २९ सप्टेंबरला वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित होणार असून, ती दर आठवड्याला प्रसारित होणार आहे. रत्नागिरीतील हॉटेल सी फॅन्स येथे झालेल्या या सोहळ्यात ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे कथालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगावच्या सरपंच वैशाली गावडे-सनगरे यांच्या हस्ते या वेबसीरिजच्या शीर्षकाचे अनावरण झाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी शीर्षकगीताचे अनावरण केले. या वेळी नाचणे गावाचे माजी सरपंच संतोष सावंत, आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर श्री. लुईस, उद्योजक दिनेश सावंत, कौस्तुभ सावंत, बांधकाम व्यावसायिक वीरेंद्र वणजू, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, तसेच नाट्य क्षेत्रातील विजय साळवी, भाग्येश खरे, अण्णा वायंगणकर, सतीश दळी, डॉ. शशांक पाटील, शेखर जोशी, अप्पा रणभिसे, दीपक सनगरे आदी उपस्थित होते.कोकणी माणूस फणसासारखा काटेरी असला, तरी आतून गोड असतो. गावाच्या सर्व गोष्टींची माहिती त्याला असते. त्याचा हा खास कोकणी स्वभाव मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवून या वेबसीरिजमधून प्रबोधन करण्यात येणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती रत्नागिरीतील समर्थकृपा प्रॉडक्शनने केली आहे. 

कथा-पटकथा अनिल दांडेकर यांची असून, क्रिएटिव्ह हेड सिद्धेश बंदरकर, सचिन काळे हे आहेत. संगीत गणेश घाणेकर यांचे आहे. ध्वनियोजना सुरेंद्र गुडेकर, आराध्या साउंड यांची असून, प्रकाशयोजना संतोष सनगरे, अनिकेत गानू यांची आहे. मेकअपची जबाबदारी नरेश पांचाळ यांनी सांभाळली असून, चित्रीकरण साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले यांनी केले आहे. संकलन निखिल पाडावे यांचे असून, प्रॉडक्शन टीममध्ये मंगेश मोरे, पिंट्या चव्हाण, मंगेश चव्हाण, श्रेयस मुळे, योगेश बांडागळे यांचा समावेश आहे. 

या वेबसीरिजला चवे, रानपाट, पोचरी ग्रामस्थांचे विशेष साह्य लाभले आहे. सुनील बेंडखळे, सचिन काळे, प्रभाकर डाऊल, अक्षता कांबळी, विश्वास सनगरे, मनाली मिराशी, रवींद्र गोनबरे, अनिकेत गोनबरे, हनुमान गोनबरे, आदेश मालप, योगेश बांडागळे, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, केतन शिंदे, राज शिंदे हे कलाकार या वेबसीरिजमध्ये आहेत.

(‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Aijaz Mahmood Ibji About 20 Days ago
उत्तम
0
0

Select Language
Share Link
 
Search