Next
विशेष मुलांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
प्रशांत सिनकर
Friday, October 26, 2018 | 01:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जनसंवाद सोशल फाउंडेशन व विद्या महामंडळ संस्थेची मूकबधिर शाळा यांच्यातर्फे विशेष मुलांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित केले आहे. याचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार असून, या वेळी अभिनेते सुयश टिळक उपस्थित राहणार आहेत.

आपटे रस्त्यावरील विद्या महामंडळ- आपटे शाळेत सकाळी १०.३० ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन भरणार आहे. पणत्या, आकाशकंदिल, इलेक्ट्रिकच्या सुबक माळा, शुभेच्छापत्रे, पिशव्या, पेंटिंग्ज आणि इतरही कलात्मक वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

प्रदर्शनाविषयी :
दिवस :
२७ व २८ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी १०.३० ते रात्री आठ
स्थळ : विद्या महामंडळ, आपटे शाळा, आपटे रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search