Next
फिल्मफेअर २०१९; रणबिर-आलिया ठरले सर्वोत्कृष्ट
‘राझी’ने पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
BOI
Monday, March 25, 2019 | 03:33 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : विविध प्रकारच्या पुरस्कारांच्या स्वरुपात चित्रपट सृष्टीतील कलाकारांना त्यांच्या कामाची पावती मिळत असते. अशाच मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. नुकत्याच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर २०१९’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रणबिर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट नायक व नायिका पुरस्कार पटकावले आहेत. 

चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची जेवढी कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात, तेवढीच प्रेक्षकही पाहत असतात. मुंबईतील ‘जिओ गार्डन’ याठिकाणी रंगलेल्या यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनेक कलाकारांनी परफॉरमन्स सादर करत सोहळ्याला चार चाँद लावले. अभिनेता रणविर सिंग तसेच जान्हवी कपूर यांनी सोहळ्यात रंगत आणली. उरी फेम अभिनेता विकी कौशल आणि अंशुमन खुराना या दोघांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत सोहळा आणखी रंगतदार केला. 

‘राझी’, ‘बधाई हो’, ‘अंदाधुन’, ‘स्त्री’, ‘संजू’, ‘पद्मावत’ या चित्रपटांमध्ये यंदा चुरस पाहायला मिळाली. आलियाला ‘राझी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नायिका, तर रणबिर कपूरला ‘संजू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नायक हा पुरस्कार मिळाला. समीक्षक प्रकारांत रणविर सिंग, आयुष्मान खुराणा आणि नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट नायक व नायिका पुरस्कार देण्यात आले. चित्रपट ‘राझी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर समीक्षण प्रकारात ‘अंदाधुन’ सर्वोत्तम ठरला. 

याव्यतिरिक्त मेघना गुलजार, गजराज राव, विकी कौशल, इशान खट्टर, सारा अली खान, अमर कौशिक यांना पुरस्कार मिळाले. ‘राझी’ चित्रपटातील ‘ए वतन..’ गाण्यासाठी गीतकार गुलजार आणि गायक अर्जित सिंग यांना पुरस्कार मिळाले. तर गायिका श्रेया घोषाल हिला पद्मावतमधील घुमर गाण्यासाठी पुरस्कार देण्यात आला. याव्यतिरिक्त अनेक दिग्दर्शक, कलाकार, कथा, पटकथा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search