Next
दीप्ती नवलना बनवायचा होता अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट
BOI
Tuesday, July 24, 2018 | 06:18 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका दीप्ती नवल यांनी प्रसिद्ध भारतीय चित्रकर्ती अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी खूप संशोधनही केले होते,’ अशी माहिती अभिनेता जिम्मी शेरगिलने अलीकडेच एका कार्यक्रमात दिली. अमृता शेरगिल यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी त्यांच्यावरील चित्रपट आजच्या काळात नक्कीच यायला हवा, असे मतही त्याने व्यक्त केले.

अमृता शेरगिल म्हणजे जिम्मी शेरगिलच्या वडिलांची काकू. त्यांच्यासंदर्भातील काही आठवणींना वेळच्या आठवणींना उजाळा देताना जिम्मी म्हणाला, ‘साधारण तीस वर्षांपूर्वी दीप्ती नवल यांना अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट करण्याची इच्छा होती. त्याकरिता त्यांची माहिती मिळवण्यासाठी त्या धडपडत होत्या, संशोधन करत होत्या. त्या निमित्ताने त्या आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये राहत होतो आणि मी तेव्हा शाळेत जात होतो. दीप्ती नवल आमच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटल्या आणि माहिती घेतली. त्यांनी या विषयावर खूप काम केलं असल्याने त्यांच्याकडे माहितीचे भांडार आहे.’ तो चित्रपट प्रत्यक्षात आला नाही; मात्र तो आता यायला हवा, असे वाटत असल्याचे जिम्मीने सांगितले. 

अमृता शेरगिल या हंगेरियन-भारतीय वंशाच्या चित्रकार होत्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उदयाला आलेल्या स्त्री चित्रकार आणि आधुनिक भारतीय कलेच्या प्रणेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. डिसेंबर १९४१मध्ये गूढ कारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण आजही उलगडलेले नाही. 

‘आजही कोणाला अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट करण्याची इच्छा असेल, तर माझ्याकडे यावे, काही माहिती हवी असेल तर मी मदत करायला तयार आहे,’ असेही जिम्मीने सांगितले. ‘एखाद्याने आयुष्यात खूप चांगले काम केले असेल, तर त्या व्यक्तीवर चित्रपट निघाला पाहिजे. कलाकार,  दिग्दर्शक, निर्माते यांची इच्छा असेल, तर त्यात काही अडचण येऊ नये,’ असे मतही त्याने व्यक्त केले.  

हा ४७ वर्षीय अभिनेता ‘साहेब बिवी और गँगस्टर थ्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित या चित्रपटात साहेब आदित्य प्रताप सिंग ही व्यक्तिरेखा जिम्मी साकारत आहे. संजय दत्त, माही गिल आणि चित्रांगदा सिंग यांच्याही यात भूमिका आहेत. २७ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link