Next
चित्रपट निर्मिती कार्यशाळेला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

एरंडवणे : चित्रपट निर्मिती संदर्भातील विविध बारकावे, संबंधित तंत्रांची ओळख व व्याप्ती समजून घेण्यासाठी एरंडवणे येथील मोंताज फिल्म स्कूलमध्ये पटकथा लेखन, छायाचित्रण, संकलन व अभिनय या चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या तंत्रावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

चित्रपट हे समाजावर सखोल परिणाम करणारे माध्यम असून, या क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना या क्षेत्राविषयी सखोल माहिती, या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी, शक्यता तसेच मर्यादा या विषयी जागरूकता आणि ज्ञान असणे आवश्यक असते. नुकत्याच झालेल्या या कार्यशाळेत अनुभवी तंत्रज्ञ व कलाकारांनी चित्रपट निर्मितीविषयी मार्गदर्शन केले. चित्रपट संकलनाविषयी अमृता कुलकर्णी, विराज मुनोत व तुषार सकपाळ, तर छायाचित्रणासंबंधी शैलेंद्र निर्मळे व अभिषेक इंद्रेकर यांनी मार्गदर्शन केले. धनंजय भावलेकर व अक्षय कदम यांनी पटकथा लेखनाविषयी, तर अभिनयासंबंधी संजय मोरे, जयेश संघवी व रणजित मोहिते या नाट्य व सिने अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे आयोजन मोंताज फिल्म स्कूलच्या समन्वयक सायली तनपुरे यांनी केले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search