Next
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विश्वकोश दर्शन
प्रेस रिलीज
Tuesday, August 21, 2018 | 02:39 PM
15 0 0
Share this article:


औंध :  येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी विभागांतर्गत ‘विश्वकोश दर्शन’ उपक्रम घेण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल प्रा. एकनाथ झावरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘अनेक विदयार्थ्यांना विश्वकोश म्हणजे काय हे माहीत नसल्यामुळे त्याचे वाचन करता येत नाही. त्यामुळे  विश्वकोश म्हणजे काय, ते कशासाठी पहावेत, ते अल्फाबेटीकली कसे पहाता येतात. हे विदयार्थ्यांना समजले तर विद्यार्थी विश्वकोश पहातील - वाचतील. त्यामुळे विदयार्थ्यांना जगाचे ज्ञान होईल. विश्वकोशाचे खंड आता डीव्हीडी स्वरूपातसुद्धा उपलब्ध असून, गूगलवरतीसुद्धा ते पाहता येतात.’ अँड्रॉईड मोबाईलवर विश्वकोश पाहता येतात, त्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी विद्यार्थ्यांना करून दाखविले.

या वेळी  प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या,  ‘आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारचे विश्वकोश उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना ते पाहता यावेत. त्यातील माहिती कशा पद्धतीने पहावी, हे विद्यार्थ्यांना कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर हे विश्वकोश खुल्या स्वरुपात ठेवण्यात येणार आहेत.’ 

या वेळी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. संजय नगरकर यांनी स्वतः लिहिलेली ‘महाराष्ट्रातील विस्थापित आणि मराठी कादंबरी’, तसेच साहित्य परिषदेचा अ.वा. कुलकर्णी पुरस्कार प्राप्त ‘मराठी कादंबरीची  शोकांतिका’ ही दोन पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट दिली.

 महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ,   डॉ. अतुल चौरे,  प्रा. सुप्रिया पवार आणि मराठी विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Trupti patil About 247 Days ago
Very good all the best wishes
0
0
PRAKASH GADEKAR About 247 Days ago
Very GOOD achievements. Keeps Marathi upper & upper. All the BEST.
0
0
Dilip Sonawane About 247 Days ago
Very good initiative. Keep Marathi flying
0
0

Select Language
Share Link
 
Search